Osmanabad | उस्मानाबादेत विद्यापीठ उपकेंद्रात विद्यार्थ्यांचं आंदोलन, परीक्षा ऑनलाइन MCQ पद्धतीने घेण्याची मागणी

वस्तुनिष्ठ पर्यायबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा कुलगुरू यांना आहे. औरंगाबाद विभागातील सर्व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता मागणी मान्य करावी अशी विनंती केली आहे.

Osmanabad | उस्मानाबादेत विद्यापीठ उपकेंद्रात विद्यार्थ्यांचं आंदोलन, परीक्षा ऑनलाइन MCQ पद्धतीने घेण्याची मागणी
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 08, 2022 | 6:07 PM

उस्मानाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) उस्मानाबाद (Osmanabad) येथील उपकेंद्रात विद्यार्थ्यांणी ठिय्या करत घेराव आंदोलन केले. लॉ विधी विभागासह अन्य विषयांच्या परीक्षा ऑनलाईन MCQ म्हणजे वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्याची मागणी विद्यार्थी यांनी केली आहे. संतप्त विद्यार्थी यांनी विद्यापीठ उपकेंद्रात प्रमुखांना घेराव घालत आंदोलन केले, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी (Student agitation) दिला आहे. विद्यार्थी यांच्या या आंदोलनास अनेक संघटनानी पाठिंबा दिला आहे. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर, कोल्हापूर विद्यापीठच्या धर्तीवर वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी केली. अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नसताना परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत त्यामुळे आगामी काळात हे आंदोलन पेटणार आहे.

काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या?

  1. LLB प्रथम वर्ष ( Three Year कोर्स ) व Pre Law प्रथम वर्षच्या परीक्षा MCQ (वस्तुनिष्ठ) ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी होत आहे. राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ , छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूर, जळगाव व अमरावतीसह अन्य विद्यापीठ यांनी MCQ परीक्षा पद्धत अवलंबली आहे त्यामुळे औरंगाबाद विद्यापीठाने MCQ बाबत सकारात्मक विचार करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा.
  2. LLB प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राचा निकाल हा 27 जून 2022 रोजी लागला आहे, निकाल लागल्यानंतर दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम कालावधी हा किमान 3 महिने असणे अपेक्षित आहे मात्र अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही. द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने विद्यार्थीना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे
  3. सध्या LLB प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राचे परीक्षेसाठीचे अर्ज भरणे सुरु असून त्याची कॉलेजस्तरावर मुदत 9 जुलै पर्यंत आहे त्यामुळे विद्यापीठ वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊ शकते, त्यास अजून उशीर झालेला नाही. वस्तुनिष्ठ पर्यायबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा कुलगुरू यांना आहे. औरंगाबाद विभागातील सर्व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता मागणी मान्य करावी अशी विनंती केली आहे.