AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भावनेच्या भरात निर्णय घेतो पण..; लग्नाविना आई झाल्याबद्दल अभिनेत्रीचं दु:ख

अभिनेत्री नीना गुप्ता या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्या गरोदर राहिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 'सिंगल मदर' होण्याचा निर्णय घेतला होता.

भावनेच्या भरात निर्णय घेतो पण..; लग्नाविना आई झाल्याबद्दल अभिनेत्रीचं दु:ख
Neena GuptaImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 08, 2026 | 11:17 AM
Share

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. आपल्या आगामी ‘वध 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्या पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळपणे व्यक्त झाल्या. करिअर, लग्न न करता मुलीला जन्म देणं आणि तिला लहानाचं मोठं करणं, लग्नाविषयी आई होण्याचा संघर्ष यांबद्दल नीना गुप्ता व्यक्त झाल्या. माजी क्रिकेचर विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांचं अफेअर एकेकाळी जगजाहीर होतं. या दोघांना मसाबा ही मुलगी आहे. विवियन रिचर्ड्स यांनी नीना यांच्याशी लग्न केलं नाही. त्यामुळे मुलीचं संगोपन नीना यांनाच करावं लागलं होतं. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ‘सिंगल मदर’ होणं हे ऐकायला जितकं क्रांतिकारी वाटतं, तितकंच खऱ्या आयुष्यात ते आव्हानात्मक आहे.

एकटीनेच मुलीचं संगोपन करणं काही सोपं नाही, त्यासाठी जबरदस्त हिंमत लागते आणि पावलोपावली तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागतो, हे नीना गुप्ता यांनी मान्य केलं. याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “मी एक अभिनेत्री आहे आणि माझं काम असं आहे की मला शारीरिक रुपात सेटवर हजर राहावं लागतं. त्यावेळी माझ्यासमोर सर्वांत मोठा प्रश्न हाच होता की मी मुलीला कुठे सोडू? कोणाच्या भरवश्यावर सोडू? काम आणि बाळाच्या संगोपनामध्ये मी इतकी अडकली होती की मला पार्लर जायलाही वेळ नव्हता. तारुण्यात भावनेच्या भरात आपण काही निर्णय घेतो. मी याआधीही लोकांना सल्ला दिला आहे की नीना गुप्ताने केलं म्हणून तुम्हीसुद्धा करू नका. माझ्या आयुष्यातील हा सर्वांत कठीण निर्णयांपैकी एक होता.”

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

या मुलाखतीत काही हलक्याफुलक्या विषयांवर बोलताना नीना यांनी मजेशीर खुलासा केला. “मी माझ्या आयुष्यात फक्त दोनच लोकांना खूप घाबरते. एक देव आणि दुसरी माझी मुलगी मसाबा. मी मसाबाला खूप घाबरते. आजकालची मुलं अनेक गोष्टींमध्ये खूप पुढे गेली आहेत. सोशल मीडियावर मी काहीही पोस्ट करण्यासाठी शंभर वेळा विचार करते. कारण जर मसाबाला ती गोष्ट आवडली नाही तर ती मला लगेच डिलिट करायला सांगते आणि मी चुपचाप तिचं ऐकते”, असं त्यांनी सांगितलं.

1988 मध्ये नीना गुप्ता आई झाल्या होत्या. नीना आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी विवियन आधीच विवाहित होते. नीना गुप्तासाठी ते त्यांचं लग्न मोडायला किंवा घटस्फोट घ्यायला तयार नव्हते. त्यांनी नीना यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर बाळाला जन्म देण्याच्या निर्णयाची जबाबदारी त्यांनी नीना यांच्यावर सोपवली होती. तेव्हा नीना यांनी बाळाबद्दल मोठा निर्णय घेतला आणि एकल मातृत्व स्वीकारलं. 2008 मध्ये त्यांनी विवेक मिश्रा यांच्याशी लग्न केलं.

Follow Us
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन