धक्कादायक | त्यानं शेळी मारली म्हणून मृतदेहावरच विष टाकलं, सोयगावातल्या दोन बिबट्यांच्या मृत्यूचं कारण उलगडलं… 

| Updated on: Mar 01, 2022 | 3:21 PM

बिबट्याने या आरोपीच्या शेळीची शिकार केली होती. त्यामुळे त्याच मृत शेळीच्या मृतदेहावर विष टाकून बिबट्याला जीवे मारण्याचा (Leopard Death) प्रकार केल्याची कबुली त्याने दिली.

धक्कादायक | त्यानं शेळी मारली म्हणून मृतदेहावरच विष टाकलं, सोयगावातल्या दोन बिबट्यांच्या मृत्यूचं कारण उलगडलं... 
Follow us on

औरंगाबादः सोयगाव तालुक्यात (Aurangabad Leopard) काही दिवसांपूर्वी एकापाठोपाठ एक दोन बिबट्यांचा मरणांत वेदनांनंतर मृत्यू झाला होता. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे बिबट्याची शिकार करण्यासाठी मृत शेळीच्या शरीरावर विषप्रयोग (Poison) करण्यात आला होता, अशी माहिती आरोपीने दिली. बिबट्याने या आरोपीच्या शेळीची शिकार केली होती. त्यामुळे त्याच मृत शेळीच्या मृतदेहावर विष टाकून बिबट्याला जीवे मारण्याचा (Leopard Death) प्रकार केल्याची कबुली त्याने दिली. बिबट्याने हे भक्ष्य म्हणून खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वन विभागाच्या चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. वनविभागाच्या पथकांनी मृत जनावरे मालकावर संशय घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. खाक्या दाखवताच त्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपीला आता तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

मागील आठवड्यात दोन बिबट्यांचा मृत्यू

स्थानिक पत्रकार भारत पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारात दिनांक 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी नर आणि मादी असे दोन बिबटे अत्यवस्थ अवस्थेत आढळले होते. यामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्यावर आढळलेला नर बिबटयाचा सायंकाळी उशीरा जागेवरच मृत्यू झाला होता तर मादीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकांनी घटनास्थळ ताब्यात घेऊन 24 फेब्रुवारीपासून तपास यंत्रणा हलविली. जवळच असलेल्या नाल्यात मृत शेळीचा सांगाडा आढळून आल्यावरून वनविभागाला तपासाचा धागा मिळाला. वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी या सांगाड्यावरून तपास यंत्रणा गतिमान केली.

शेळी मालकाने केला विषप्रयोग

या प्रकरणी मृत शेळीवरच विष टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. शेळी मालकाचा शोध घेतला त्या मृत शेळ्या ज्ञानेश्वर परदेशी (रा.माळेगाव पिंप्री) यांच्या असल्याचा निदर्शनास आले . त्यांची चौकशी केली असता त्यांनी या मृत शेळी वर विषप्रयोग केल्यानेच हे विष दोन्ही बिबट्यांच्या सेवनात आल्याचे सांगितले. ही कारवाई वनसंरक्षक सत्यजित गुजर, उपवनसंरक्षक एस.व्ही मंकावार,सहायक उपवनसंरक्षक पुष्पां पवार,यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ, वनपाल अनिल पाटील,वनपाल गणेश सपकाळ, आदींसह नितेश मुलतानी,एस. टी चेके, सुनील हिरेकर,सुदाम राठोड,जी. टी नागरगोजे,कृष्णा पाटील आदींच्या पथकांनी ही कारवाई केली.

इतर बातम्या-

Miss Ukraine Anastasiia lenna : मिस युक्रेनच्या हाती बंदूक, अनास्तासिया लेना सैन्यात भरती?

Income Tax : ‘या’ 5 रोखीच्या व्यवहारांवरून मिळू शकते आयकर विभागाची नोटीस, व्यवहार काळजीपूर्वक करा!

युक्रेनमधून भारतात आलेले विद्यार्थी भावनिक, अनेकांच्या डोळ्यात पाणी; व्हायरल फोटो तुम्ही पाहिले का ?