तुकाराम मुंडे यांचा आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला धसका, अधिकारी घेताय आरोग्य केंद्रांची झडती

| Updated on: Nov 04, 2022 | 1:49 PM

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर काम पूर्ण करण्यासाठी सुचनांवर सूचना केल्या जात आहे.

तुकाराम मुंडे यांचा आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला धसका, अधिकारी घेताय आरोग्य केंद्रांची झडती
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीचे आणि कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून ओळख आहेत. तुकाराम मुंढे ज्या ठिकाणी जातात तेथील अधिकारी मुंढे यांचा चांगलाच धसका घेत असतात. वेळेवर हजेरी लावण्यापासून आपले कर्तव्य चोखपणे कसे बजावता येईल यासाठी प्रयत्नशील असतात याचे कारण म्हणजे तुकाराम मुंढे यांची धास्ती. नुकतीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून ते राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाच्या संचालक पदी रुजू झाले आहे. त्यानुसार मुंढे यांनी राज्यातील प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेत काही विशेष सूचना केल्या होत्या. त्यामुळे आरोग्य विभागात सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांनी याचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे.

नाशिकमधील जिल्हा स्तरावरील आरोग्य अधिकारी कधीतरी ग्रामीण भागात दौरे करणारे अधिकारी आता दिवसरात्र काम करतांना दिसून येत असून मुंढे यांची धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर काम पूर्ण करण्यासाठी सुचनांवर सूचना केल्या जात आहे.

हे सुद्धा वाचा

आरोग्य सेवा विभागाचे तुकाराम मुंढे यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणतेत सुधारणा व्हावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देण्याचा एक फतवा काढला आहे. त्याची धास्ती जिल्हयातील अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

मुंढे यांच्या फतव्यामुळे आरोग्य केंद्राची स्थिती, सोईसुविधा, औषधांची उपलब्धता आणि नागरिकांची आरोग्य स्थिती याचा अहवाल मागवून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर घेत आहे.

मागील काही दिवसांत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटीसाठी केलेल्या दौऱ्यात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी नेमकं काय केलं याचीही चर्चा होऊ लागली आहे.

काही अधिकाऱ्यांनी तर विशिष्ट भागातच दौरे केल्याने त्यांच्या कामावर आणि चारित्र्यावर संशय घेण्यात आल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. याशिवाय काही महिला कर्मचाऱ्यांनी थेट तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा दम भरल्याची चर्चा आहे.

नाशिक जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली २३ अधिका-यांनी जिल्हयातील २३ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना भेटी देत तपासण्या केल्या आहे.

यामध्ये औषधांची असलेली उपलब्धता, रूग्णांची तपासणी रजिस्टर, कर्मचा-यांची दैनंदिनी, अॅडव्हान्स टुर प्लॅनप्रमाणे (ओटीपी) कामे होत आहेत की नाही यांचा आढावा घेण्यात येत आहे.

क्षयरोग तपासणी, लसीकरण, असंसर्गजन्य आजार (हायपर टेन्शन, मधुमेह, कॅन्सर) याशिवाय डेंग्यू, पिण्याच्या पाण्याची स्थिती, केंद्रातील स्वच्छता, लॅब टेस्ट, महिलांची प्रसतुतीसाठी आवश्यक उपकरणांची उपलब्धता, झालेल्या प्रसुती याचा आढावा घेतला जात आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ पाहता त्यांच्यावर मोठा ताण आहे, आरोग्य अधिकाऱ्यांना देखील ऑनलाईन कामांचा अधिकचा कार्यभार दिल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे.

मुंढे यांनी दिलेले तोंडी आदेशानुसार जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी खडबडून जागे झाले असून दिवसरात्र काम करत असून ग्रामीण भागात अचानक भेटी देण्याची प्रक्रिया राबविली जात असून आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.