Pankaja Munde Video | फोन लगा के व्हिडिओ जरूरी होता है… पंकजा मुंडेंचा फोन, अमरनाथला गेलेल्या परळीतील भाविकांची चौकशी!

| Updated on: Jul 11, 2022 | 11:07 AM

अमरनाथ यात्रेकरिता राज्यातील अनेक भाविक इथे गेले आहेत. यामध्ये बीडच्या आष्टी तालुक्यातील 38 तर परळी तालुक्यातील 24 यात्रेकरूचा समावेश आहे.

Pankaja Munde Video | फोन लगा के व्हिडिओ जरूरी होता है... पंकजा मुंडेंचा फोन, अमरनाथला गेलेल्या परळीतील भाविकांची चौकशी!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीडः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या चौकशीसाठी केलेला फोन प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनीदेखील अमरनाथ येथे अडकलेल्या परळीतील भाविकांसाठी (Amarnath Devotee) केलेला फोन तुफ्फान व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओत पंकजा मुंडे नाही तर परळीतील भाविक दिसत आहेत. फोनवरून पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) आवाज येतोय. अमरनाथ यात्रेकरिता राज्यातील अनेक भाविक इथे गेले आहेत. यामध्ये बीडच्या आष्टी तालुक्यातील 38 तर परळी तालुक्यातील 24 यात्रेकरूचा समावेश आहे. परिस्थिती सुधारत असल्याने 28 भाविक सुखरूप जिल्ह्यात परतत आहेत. तर इतर दहा जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येतय. दरम्यान याच यात्रेकरूंशी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संवाद साधत अडचणीत असलेले भाविक नेमके कुठे आहे, कसे आहेत, प्रशासन सहकार्य करते का, आदीबाबींची चौकशी करत काळजी करू नका अशा शब्दात धीर दिला. अमरनाथ येथे अडकलेले भाविकांचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहे. मात्र तेथील सुखरूप असलेले भाविक परतीच्या वाटेवर असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी सांगितले आहे.

या भाविकांचा समावेश आहे..

अमरनाथ येथे अडकलेल्या भाविकांत संतोष अप्पा चौधरी, शैलेश कदम, किशन सपाटे, अविनाश चौधरी, संतोष साबळे, अनंत बंडगर, रत्नेश बेलुरे, रघुनाथ शिरसाठ, विशाल नरवणे, सोमनाथ गित्ते, सूरज भंडारी, महेश अण्णा शिरसाठ, गजानन हालगे, ज्ञानेश्वर साबळे, विठ्ठलराव साबळे, रामदासराव काळे, पद्माकर काळे, अविनाश वडुळकर, नारायण चौलवार, गजानन कुळकर्णी, आनंद अल्बिदे, धनंजय माळी, रमेश अण्णा संकले, दीपक मोडीवाले यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांच्या फोनवर तुफ्फान प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला केलेला फोन सध्या व्हायरल होतोय. नवे मुख्यमंत्री जनतेच्या काळजीपोटी किती सतर्क आहेत, अशा आशयाच्या प्रतिक्रियाही येत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी एवढा दिखाऊपणा का करावा, अशाही काही प्रतिक्रिया येत आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तिखट प्रतिक्रिया दिली. आम्हीही विचारपूस केली. मात्र असे व्हिडिओ तयार केले नाहीत, असे ते म्हणाले.

पंकजांना मंत्रिमंडळात स्थान द्या-वैजनाथाला साकडं

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळात स्थान मिळावं. या मागणीकरीता मुंडे समर्थकांनी परळीच्या वैजनाथ मंदिरात अभिषेक घालत साकडे घातले आहे. याआधी भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नव्हत. तेव्हापासून अद्याप मुंडे समर्थक नाराज आहेत. त्यानंतर विधानपरिषद देखील पंकजा मुंडे यांची संधी हुकली, त्यामुळे किमान आता शिंदे आणि फडणवीस सरकार मध्ये पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात सामावून घेण्यात यावे अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी प्रभू वैद्यनाथाला साकडे घातले आहे.