
सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने महाराष्ट्र हळहळला होता. तर त्यांना मारताना आरोपींचे कौर्य समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. या प्रकरणात सातत्याने न्यायासाठी लोकांना जनरेटा उभारावा लागत असल्याचे दोन महिन्यात दिसून आले. तेव्हा यंत्रणा हलली. दोन महिन्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. तरी ही अजून लढा संपलेला नाही. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मस्साजोग येथून सद्भावना यात्रेसाठी दाखल झाले आहेत.
काँग्रेस मस्साजोगमध्ये
हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी आता देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका जाहीर केली. त्यांनी काही गुंडांमुळे संपूर्ण समाजाला वेठीस धरणे चुकीचे असल्याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. तर मस्साजोग ते बीड अशी त्यांची सद्भावना यात्रा दुंभलेली समाजमन जोडण्याचे काम करणार आहे.
मारेकर्यांच्या चेहर्यावर हास्य येते तरी कोठून?
महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो साधू संतांचा म्हणतो. शिव शाहू फुले आंबेडकरांचा म्हणतो आणि एखाद्या उमद्या तरुणाची हत्या या पद्धतीने जर होत असेल तर आज सगळ्या समाजाने कुठेतरी चिंतन केलं पाहिजे आणि सगळ्या समाजालाही जर आरोपीच्या पिंजऱ्यात आपण उभं करत असू तर ते चुकीचे आहे, असे सपकाळ म्हणाले.
भय, द्वेष, मत्सर आणि पैशांची एवढी लालसा की ज्यासाठी क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आल्याचे ते म्हणाले. मारेकर्यांच्या चेहर्यावर हास्य येते तरी कुठून असा काळजाला हात घालणारा सवाल त्यांनी केला. ही लढाई देशमुख कुटुंबियांची नाही तर या लढायला सर्वांना लढाऊ लागणार आहे. ही लढाई आतापर्यंत जी काही लढली या परिवाराने लढली. त्यांचा जेवढा नुकसान झालं तेवढं कोणाचे नुकसान झालं नाही ही एका बाजूला हत्या आहे तर दुसर्या बाजूला ही घटना अशी भविष्यात घडता कामा नये, असे आवाहन त्यांनी केला.
देशमुख कुटुंबियांचा तोल ढळला नाही
देशमुख कुटुंबियांचा आणि विशेष करून धनंजय देशमुख यांचा त्यांच्या कन्येचा कुठेही तोल ढळलेला नाही. त्यांनी सातत्याने विवेक पूर्ण विचार आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला आहे. विवेकवादी म्हणून ते आपल्या सगळ्यांच्या समोर आले आहेत . त्यामुळे ज्या परिवारांनी सद्भावना जोपासली आहे ते कोणत्या धर्माला नाव ठेवत नाही. कोणत्या जातीला नाव ठेवत नाही. ते काही लोक जेव्हा म्हणतात तेव्हा जो गुन्हेगार असतो त्यांची जात धर्म कोणता नसतो, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. त्यांनी देशमुख कुटुंबियांच्या संयमाचे कौतुक केले आहे.
या सद्भावना विचारांच्या विरोधात फोडा आणि राज्य करा नावाच्या प्रवृत्ती आहेत. मत्सर फसवणाऱ्या प्रवृत्ती आहेत. जाती-जातीत, धर्मा धर्मांमध्ये आपल्याला लढाई लावणाऱ्या प्रवृत्ती आहेत आणि हा एकंदर कुणाची उतरंडी समाजामध्ये ती करण्याचा प्रयत्न जो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे, असा आरोपही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.