Bhandara Shiv Sena | पवनीच्या दोन नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये मुंबईत प्रवेश, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर दाखविला विश्वास

| Updated on: Feb 17, 2022 | 9:24 AM

मुकुंदा हटवार हे सुरुवातीचे काँग्रेसचे कार्यकर्ते. विलास काटेखाये यांच्यासोबत नगरविकास आघाडीत गेले होते. काही दिवस राष्ट्रवादी तसेच भाजपामध्येही त्यांनी सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले. आता त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

Bhandara Shiv Sena | पवनीच्या दोन नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये मुंबईत प्रवेश, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर दाखविला विश्वास
मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करताना पवनीचे दोन नगरसेवक व इतर कार्यकर्ते.
Follow us on

तेजस मोहतुरे

भंडारा : जिल्ह्यातील पवनीच्या दोन नगरसेवकांनी मुंबईत काल शिवसेनेत प्रवेश केला. मुंकुंदा हटवार यांच्या पत्नी व विजय उरकुडकर असे हे दोन नगरसेवक आहेत. शिवाय काही कॉंग्रेस, भाजप (BJP) कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झालेत. त्यामुळं पवनीत आता शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झालंय. मुकुंदा उर्फ बंडू हटवार (Mukunda Hatwar) यांच्या पत्नी दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडूण आल्यात. गेल्या वीस वर्षांपासून हे दाम्पत्य राजकारणात आहेत. राज्यात शिवसेनेची सरकार आहे. त्यामुळं शिवसेनेतील इनकमिंग वाढत आहे. मुकुंदा हटवार हे सुरुवातीचे काँग्रेसचे कार्यकर्ते. विलास काटेखाये यांच्यासोबत नगरविकास आघाडीत गेले होते. काही दिवस राष्ट्रवादी तसेच भाजपामध्येही त्यांनी सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले. आता त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. मुंबईत जाऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळं पवनीत शिवसेनेची (Pawani Shiv Sena) ताकद वाढणाराय.

एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश

भंडारा-पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पवनी नगरपालिकेच्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. कॉंग्रेस, भाजपच्या 6 प्रमुख कार्यकर्त्यांनी मुंबईत शिवसेना पक्षात प्रवेश केला. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश देण्यात आला. यामध्ये नगरविकास आघाडीचे नगरसेवक मुकुंदा उर्फ बंडू हटवार यांच्या पत्नी, नगरसेवक विजय उरकुडकर, कॉंग्रेसच्या अलपसंख्यांक सेलचे पवनी तालुका अध्यक्ष सय्यद सुलतान अली, भाजप कार्यकर्ते भास्कर चांदेवार, सामाजिक कार्यकर्ते प्रबुध्द मेश्राम, सेवानिवृत्त शिक्षक काशिनाथ कांबळी यांनी काल मुंबईतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

पवनी नगरपालिकेवर भगवा फडकविणार – हटवार

आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात पवनी नगरपालिकेवर भगवा फडकवून शहराचा विकास घडवून आणण्याकरिता शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया मुकुंदा हटवार यांनी दिली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, युवासेना जिल्हा प्रमुख मुकेश थोटे, विद्यार्थी सेना जिल्हा अधिकारी जितेश ईखार, पवनी शहर संघटक नामदेव सूरकर, पवनी तालुका युवा सेना प्रमुख मुन्ना तिघरे आदी उपस्थित होते. ऐन नगरपालिका निवडणुकीसमोर प्रवेश घेतल्याने पवनी शहरात शिवसेनेची शक्ती वाढली आहे.

Nagpur | आता महिला उद्योजकांसाठी स्टार्ट अप, आर्थिक सक्षमीकरणाचा उपक्रम काय आहे, जाणून घ्या

Bhandara | कोरोनात जिच्या पतीचा झाला मृत्यू तिनेच सावरला व्यवसायाचा गाडा, भंडाऱ्यातील महिलेची संघर्षमय कहाणी

नागपुरात महसूल विभागाचे महाराजस्व अभियान; फेरफार अदालत शुक्रवारी, नेमकी कोणती कामे होणार?