पंढरपूरात आज लाल मातीतली दंगल, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेखही या मल्लांसह कोण-कोण उपस्थित राहणार?

| Updated on: Jan 24, 2023 | 8:38 AM

पैलवान महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्या कुस्तीवरून आरोप प्रत्यारोप झाले होते, त्यानंतर आज महेंद्र आणि सिकंदर पहिल्यांदाच कुस्तीच्या फडात दिसणार आहेत.

पंढरपूरात आज लाल मातीतली दंगल, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेखही या मल्लांसह कोण-कोण उपस्थित राहणार?
Image Credit source: Google
Follow us on

सागर सुरवसे, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर पैलवान महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्या कुस्तीची जोरदार चर्चा झाली होती. इतकंच काय राजकीय आखाड्यातील नेतेही बोलू लागले होते. त्यामुळे राज्यभर महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू होते. लाल मातीतील दंगलीचा धुराळा शांत होत नाही तोच पंढरपूरात भीमा केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. भीमा केसरी स्पर्धेसाठी आज दिग्गज पैलवान कुस्तीच्या फडात दिसणार आहे. यामध्ये उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, पैलवान सिकंदर शेख, तसेच हरियाणा, पंजाबसह मातब्बर पैलवान आज कुस्तीच्या फडात उतरणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादानंतर पहिल्यांदाच सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड एकाच स्पर्धेसाठी येणार आहे.

पंढरपूर तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये या कुस्त्या भरवण्यात आल्या आहेत. कुस्त्यांचे नियोजन पूर्ण झाले असून पैलवान पंढरपूरात दाखल होऊ लागले आहे.

पैलवान महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्या कुस्तीवरून आरोप प्रत्यारोप झाले होते, त्यानंतर आज महेंद्र आणि सिकंदर पहिल्यांदाच कुस्तीच्या फडात दिसणार आहेत.

हे सुद्धा वाचा

महेंद्र आणि सिकंदर यांच्यात कुस्ती होणार नसली तरी राष्ट्रीय पातळीवरील अनेक पैलवानांसोबत त्यांची कुस्ती होणार आहे, त्यामुळे महेंद्र आणि सिकंदर यांची कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

भीमा केसरी स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह इतर राज्यातील पैलवान हजेरी लावणार आहे. त्याकरिता भीमा केसरीच्या आयोजकांची तयारी पूर्ण झाली आहे. असून कुस्तीच्या फडात कोण कुणाला चितपट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.