AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Chakankar : राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राजकारणात बसणार अजून एक मोठा धक्का

Rupali Chakankar : सध्या महाराष्ट्रासह देशात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत आहे. अशोक खरातचे धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. या भोंदूबाबाने कोट्यवधीची बेनामी मालमत्ता गोळा केली आहे. या अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आलं होतं.

Rupali Chakankar : राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राजकारणात बसणार अजून एक मोठा धक्का
Rupali Chakankar
| Updated on: Mar 26, 2026 | 8:30 PM
Share

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. अशोक खरात याच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहेत. सोशल मीडियावर अशोक खरात याच्या महिलांवर अत्याचार करतानाच्या क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. अशोक खरातचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्यावर हत्येचा सुद्धा आरोप झाला आहे. या अशोक खरात प्रकरणात सर्वप्रथम रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आलं. अशोक खरातची त्या पूजा करत असल्याचे फोटो व्हायरल झाले. अशोक खरातचा भोंदूगिरीचा दरबार लागायचा. त्यात त्या हजर असल्याचं दिसलं. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा गोष्टींना खतपाणी घालणं एक गंभीर बाब आहे. त्या शिवाय अशोक खरात सोबत त्यांचे आर्थिक व्यवहार असल्याचे आरोप झाले. अखेरीस रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. मागच्या आठवड्यात त्यांनी शासनाशी संबंधित असलेल्या या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला. राजीनामा देताना रुपालीच चाकणकर यांनी व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं म्हटलं. अशोक खरात प्रकरणाचा त्यांनी राजीनाम्यात उल्लेख केला नाही.

राष्ट्रवादीच्या नेत्याचं एकमत

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं महिला प्रदेशाध्यक्षपद सुद्धा सोडावं लागणार अशी चर्चा सुरु झालेली. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. पण आता लवकरच त्यांना पक्षाकडून या पदावरुन हटवलं जाऊ शकतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व महत्वाच्या नेत्यांकडून रुपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याच्या संदर्भात एकमत झालं आहे.

विषय सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात

दर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बैठक होत असते. या बैठकीत राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांनी आणि अनेक आमदारांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाला डाग लागतोय. पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. सोशल मीडियावर या संदर्भात चर्चा सुरु आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी आमदार आणि नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. आता रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचा विषय सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?