AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat : खरातचे अल्पवयीन मुलीसोबतही नको ते चाळे, लिंगपिसाट भोंदूबाबाची आणखी एक विकृती उघड

भोंदूबाबा अशोक खरातच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. स्वतःला ज्योतिषी, कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या खरातला 17 मार्चला अटक झाली. त्यानंतर अल्पवयीन मुलींसह अनेक महिलांनी त्याच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या. शंकराचा अवतार सांगून त्याने अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले आणि लैंगिक अत्याचार केला. आतापर्यंत 7 गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या विकृत कारनाम्यांनी समाज हादरला आहे.

Ashok Kharat : खरातचे अल्पवयीन मुलीसोबतही नको ते चाळे, लिंगपिसाट भोंदूबाबाची आणखी एक विकृती उघड
अशोक खरातच्या अडचणी वाढल्या
| Updated on: Mar 26, 2026 | 9:28 AM
Share

स्वत:ला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा, अंकशास्त्रज्ञ, ज्योतिषी असल्याचा दावा करणारा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) हा किती बोगस, विकृत आहे, याची एकेक धडकी भरवणारी माहिती उघड होत आहे. महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपखाली त्याला 17 मार्चला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर यायला लागले असून त्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या काही महिला धाडस दाखवत पुढे येत आहेत. अनेकींनी आपबिती कथन करत खरात याच्याविरोधात पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. आत्तापर्यंत खरात याच्याविरोधात 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिलांना फसवून, त्यांना भीती घालून अत्याचार करणाऱ्या खरातचा एक नवा करनामाही आता समोर आला असून त्याने वासनेसाठी अल्पवयीन मुलीलाही लक्ष्य केल्याचं उघड झालंय.

खरातला अटक झाल्यानंतर आता अनेक पीडिता समोर आल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीनंही धाडस धाकवत खरातविरोधात तक्रार दाखल केली आहे. अशोक खरातने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने पोलिसांसमोर केला आहे. यामुळे खरातच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.

मी शंकराचा अवतार सांगत मुलीला ओढलं जाळ्यात

मिळालेल्या माहितीनुसार, ही पीडित मुलगी अल्पवयीन असून ती अहिल्यानगरची रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा भोंदू खरातशी संपर्क झाला. “माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी शंकराचा अवतार आहे” असा दाव करत खरात याने त्या मुलीला जाळ्यात ओढलं. शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी विशिष्ट पूजा करावी लागेल, असं त्याने तिला सांगितल्याचा दावा मुलीने केला आहे. त्यानंतर खरातने मुलीचा विश्वास संपादन केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप करत त्या अल्पवयीन मुलीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खरातने अल्पवयीन मुलीलाही लक्ष्य केल्याने खळबळ उडाली असून त्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत आहे. त्याने इतरही काही अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढत अत्याचार केले का याचा तपास सुरू आहे.

खरात प्रकरणात पोलिस तपासाला नवे वळण

भोंदू अशोक खरात प्रकरणात पोलिस तपासाला नवं वळण लागलं आहे. याप्रकरणात बड्या आयुर्वेदिक औषधे व जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार आहे. खरातने या दुकानातून हरिणाची कस्तुरी व जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे, तसेच नाशिकरोड परिसरातील एक ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर असून संबंधित ज्वेलर्सकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. अंधश्रद्धा व फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

Follow Us
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा