AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वबळावर की महायुती? शिंदेंचं ठरलं, महापालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर बोलताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

स्वबळावर की महायुती? शिंदेंचं ठरलं, महापालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2025 | 3:34 PM
Share

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता या निवडणुकांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपकडून विभाग बैठकांचा धडाका सुरू असून, या बैठकांमधून त्या-त्या विभागांमध्ये येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीचा आढावा सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट देखील निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.

मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार याचं चित्र अद्याप स्पष्ट नाही. भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीमध्येच लढवल्या जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, जीथे आपली जागा भक्कम असेल तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल अशी देखील भूमिका मांडण्यात येत आहे. यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी तर थेट भाजपावर आरोपच केला आहे, भाजप सर्वांसमोर महायुतीबाबत बोलते, आणि एकंतात स्वबळाचा विचार करते असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे आता ही निवडणुका महायुती म्हणून लढवली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. कोण युती आघाडी करत आहे, हा त्यांचा प्रश्न आहे, लोकशाहीमध्ये कोणीही युती आघाडी करू शकतो, परंतु मला विश्वास आहे, केलेल्या कामाच्या जोरावर  महायुतीच जिंकणार, महायुती केलेल्या कामांच्या जोरावर निवडणूक लढवणार,  पालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महायुतीला केलेल्या कामाची पोचपावती विधानसभा निवडणुकीत मिळालेली आहे, असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान ठाकरेंच्या आरोपांना कामातून उत्तर देत आलो आहे, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...