AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांना धक्का, मामाला चकवा देत तनपुरेंचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; मोठी जबाबदारी मिळणार?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आता तनपुरे यांना अहिल्यानगरमधून विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

पवारांना धक्का, मामाला चकवा देत तनपुरेंचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; मोठी जबाबदारी मिळणार?
Prajakt Tanpure join bjpImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 30, 2026 | 3:35 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आता तनपुरे यांना अहिल्यानगरमधून विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तनपुरे यांनी हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतल्याचे म्हटले आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला.

प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील प्रभावी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या काळात त्यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सुरुवात झाली होती. आज अखेर त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनीही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले जयंत पाटील

प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, ‘त्यांचा भाजप प्रवेश झाल्याचं मी काही वेळापूर्वी ऐकलं. माझा आणि त्यांचा काही संपर्क झालेला नाही. त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करण आमच्यासाठी धक्कादायक आहे. पण त्यांनी त्यांच्या मतदासंघातील परिस्थिती पाहून हा निर्णय घेतलाय असं मला वाटतं. त्यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली की नाही मला माहित नाही. मी त्यांना संपर्क केलेला नाही.

प्राजक्त तनपुरे यांनी प्रवेशावर काय म्हटले?

प्राजक्त तनपुरे यांनी भाजप प्रवेशावर बोलताना म्हटले की, ‘आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी मी माझ्या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. मात्र जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याशी थेट बोलण्याची हिंमत झाली नाही. मी माझी भूमिका आणि भावना सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली होती.’

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट