AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच आता घडामोडींना वेग आला असून, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2025 | 9:28 PM
Share

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातू दुसऱ्या पक्षात अनेक पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीला बसला आहे, आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.

आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे यावेळी महाविकास आघाडीला नाही तर महायुतीला मोठा धक्का बसला आहे. दहिसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. दहिसर विधानसभा मतदारसंघात मनसेने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश कार्यक्रमात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी  अविनाश अभ्यंकर आणि नयन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मनसेत प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा झटका मानला जात आहे.

अविनाश अभ्यंकर यांची प्रतिक्रिया 

शेवटी खऱ्या विचारांच्या मागे जनता उभी असते,  थोडा वेळ लागतो पण सबर का फल मीठा होता है, जेव्हा लोकांना कळलं की दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काहीही होत नाही, नुसती आश्वासनाची खैरात आहे, तेव्हा आता इतर पक्षातून मनसेमध्ये लोक प्रवेश करत आहेत. उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येनं मनसेमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्रामध्ये मनसेची ताकद काय आहे? ते लवकरच महापालिका निवडणुकींमधून दिसेल,  संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम तयारी सुरू झालेली आहे, असं यावेळी  अभ्यंकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज पुन्हा एकदा मनसेप्रमुख राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर गेले होते, ही गेल्या तीन महिन्यात दोन्ही ठाकरे बंधूंची सातवी भेट आहे. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. मात्र दुसरीकडे या युतीवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात बिनसल्याचं चित्र आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...