AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बड्या नेत्याचा मनसेला जय महाराष्ट्र; राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच भाजपात मोठा पक्षप्रवेश

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. महापालिका निवडणुकीची धामधुम सुरू असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे, बड्या नेत्यानं भाजपात प्रवेश केला आहे.

बड्या नेत्याचा मनसेला जय महाराष्ट्र; राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच भाजपात मोठा पक्षप्रवेश
raj thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 11, 2026 | 7:20 PM
Share

राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचाराला देखील वेग आला आहे. आज मुंबईमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. तब्बल वीस वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मुंबई महापालिकेसह इतर काही महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली आहे. त्यामुळे आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे मात्र या सभेपूर्वीच राज ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे, आणखी एका नेत्यानं राज ठाकरे यांची साथ सोडली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटासोबत मनसेनं युती केली. मात्र या युतीनंतर मनसेला धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक नेत्यांनी मनसेची साथ सोडली आहे, आता आणखी एका नेत्यानं भाजपात प्रवेश केला आहे. मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मनोज घरत यांनी भाजपचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात मनसेमधून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता, त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती, अखेर त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. आज डोंबिवलीमधील गोपी चौक परिसरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. हा महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मनसे, शिवसेना ठाकरे गट युती  

दरम्यान यावेळी राज्याच्या राजकारणात एक नवा प्रयोग पहायला मिळत आहे, तब्बल वीस वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू महापालिका निवडणुकांसाठी एकत्र आले आहेत. मनसेनं शिवसेना ठाकरे गटासोबत युती केली आहे. या युतीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा देखील सहभाग आहे. त्यामुळे यावेळी मुंबईत  महायुतीपुढे दोन्ही ठाकरे बंधूंच तगडं आव्हान असणार आहे. मुंबईमध्ये भाजपनं शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...