AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का, मतदानाला दोन दिवस बाकी असतानाच दणका, मोठी बातमी समोर

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे, येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, मात्र त्यापूर्वी आता मोठी बातमी समोर येत असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का, मतदानाला दोन दिवस बाकी असतानाच दणका, मोठी बातमी समोर
अजित पवार Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 30, 2025 | 3:44 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वार वाहतं आहे. प्रचाराला देखील रंगत आली आहे. येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर त्यानंतर लगेचच म्हणजे तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यंदा राज्यात अनेक ठिकाणी महायुतीमधीलच घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिल्याचं चित्र पहायला मिळत आहे. काही ठिकाणी भाजप विरोधात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाविरोधात शिवसेना शिंदे गट आणि भाजप तर काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाविरोधात भाजप आणि राष्ट्रवादी अशी युती झाल्याचं पहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी हे तीनही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.

दरम्यान प्रचार रंगात असताना महायुतीच्या नेत्यांकडूनच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहे, त्यामुळे सध्या नाराजीचं वातावरण असल्याचं पहायला मिळत आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे, त्याचा फटका शिवसेना शिंदे गटाला बसल्यानं शिवसेना शिंदे गट देखील नाराज आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे.  दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

तळेगाव नगरपरिषदेतील एका बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकाला आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरे जावं लागणार आहे.  तळेगाव नगरपरिषदेमध्ये  एक नगराध्यक्ष अधिक 27 नगरसेवक अशा एकूण 28 जागा आहेत, त्यापैकी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 10 जागा तर भाजपच्या 9 जागा या बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र आता यामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. यात प्रभाग क्रमांक 7 अ च्या स्नेहा खांडगे बिनविरोध नगरसेवक झाल्या होत्या, मात्र नगरसेवक पदी विराजमान होण्याआधीचं त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरे जावं लागणार आहे.  स्नेहा खांडगे या घड्याळाच्या चिन्हावर बिनविरोध निवडून आल्या होत्या, त्यामळे हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...