AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठी बातमी

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठी बातमी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2025 | 6:19 PM
Share

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी आहे. दरम्यान निवडणुकीची घोषणा होताच, आता सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र पहायला मिळत आहे.  काही ठिकाणी युती आणि आघाडी करून तर काही ठिकाणी स्वबळावर या निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आता पक्षांतराला देखील वेग आला आहे. महाविकास आघाडीमधून काही जण महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. तर काही नेत्यांनी आपल्याच मित्र पक्षात प्रवेश केल्याचं पहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंगला सुरुवात झाली, ते इनकमिंग अजूनही सूरूच असल्याचं दिसत आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. सोलापुरातील शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.   उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील  आणि  शहराध्यक्ष संतोष पवार यांची देखील उपस्थिती होती.

मागील आठवड्यात शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुधीर खरटमल यांनी स्वतः न जाता प्रतिनिधी म्हणून कार्यकर्त्याला पाठवले होते,  त्यानंतर शरद पवार गटातून शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्यावर शरद पवार यांच्या बैठकीला भाजपचा कार्यकर्ता पाठवल्याचा आरोप झाला होता.  त्यानंतर आज त्यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश केला आहे.  हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला ऐन निवडणुकीच्या तोडांवर धक्का मानला जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...