AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला धक्का, घडामोडींना वेग

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषण झाली आहे, या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला असून, आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला धक्का, घडामोडींना वेग
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2025 | 7:41 PM
Share

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून, जोरदार पक्षांतर देखील सुरू असल्याचं पहायला मिळत आहे,  विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, पक्षांना लागलेली ही गळती महाविकास आघाडीसाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठा पक्ष प्रवेश होणार असल्याचं पहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा रहिमतपूर येथे होणार असून, त्यासाठी अजित पवार शहरात दाखल झाले आहेत, या पक्षप्रवेशापूर्वी शहरातून अजित पवार यांची ओपन जीप रॅली देखील काढण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन पाटील आणि जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे, तर दुसरीकडे या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचं बळ वाढणार आहे.

दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओबीसीसाठी राखीव असलेल्या जागांवर जे मुळचे ओबीसी आहेत, अशाच इच्छुकांना प्रधान्य द्या, जिथे ओबीसी उमेदवार उपलब्धच नसेल तर तिथे मग ज्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं आहे, अशा कुणबी इच्छूक उमेदवारांना उमेदवारी द्या, अशा सूचना या बैठकीमध्ये शरद पवार यांनी उपस्थित खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच भाजपासोबत युती नकोच असा सूर देखील या बैठकीमध्ये पुन्हा एकदा उमटला आहे.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला