AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, नेत्यानं सोडली साथ

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वी आता पक्षांतराला वेग आला असून, शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, नेत्यानं सोडली साथ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2025 | 9:29 PM
Share

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच आता राज्यात पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं पहायला मिळालं, मात्र आता महायुतीमधल्या घटक पक्षातीलच नेते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत.  शिवसेना शिंदे गटाच्या काही नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानं शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार नरेश मस्के यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत असून, आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसं रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्ह्यातील शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादीतील वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. मंत्री भरत गोगावले यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय सुरुंग लावण्यास सुरुवात केल्यानंतर, आता सुनील तटकरेंनी देखील शिवसेनेतील मोठे मासे गळाला लावायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व गोगावले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे रमेश मोरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये सुतारवाडी येथे हा जाहीर पक्षप्रवेश पार पडला, यावेळी सुनील तटकरे यांनी रमेश मोरे व त्यांच्या सहकार्यांचे आपल्या पक्षात स्वागत केले.  यावेळी बोलताना रमेश मोरे यांनी शिवसेनेवर आरोप केले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्ष प्रवेश 

दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी हा पक्षप्रवेश झाला आहे. हा रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानण्यात येत आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या की स्वबळावर याचं अद्याप कोणतंही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र दुसरीकडे पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. महायुतीमधीलच अनेक जण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असल्याचं पहायला मिळत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...