AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचा उद्धव ठाकरेंना जबर धक्का, शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांना आता पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचा उद्धव ठाकरेंना जबर धक्का, शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2025 | 1:24 PM
Share

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालं होतं, हे इनकमिंग आजही सुरूच आहे. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाले. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे  यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केल्याचं पहाला मिळालं.

दरम्यान आता पुन्हा एकदा ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर  शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे.  जळगाव महापालिकेच्या शिवसेना ठाकरे गटाच्या 13 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते  नितीन लढ्ढा यांच्यासह 13 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जळगावातील भाजप जिल्हा कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र प्रवेशासाठी मुहूर्त मिळत नसल्याने हा प्रवेश रखडला असल्याचा सांगितलं जात होतं. परंतु आता ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेशाचा मुहूर्त आज अखेर गवसला असून, आज  दुपारी चार वाजता भाजप कार्यालयात हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

तर दुसरीकडे भाजपने काही ठिकाणी आपल्या मित्र पक्षांना देखील धक्का दिला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे, यावरून शिवसेनेचे खासदार आणि नेते नरेश मस्के यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...