मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित व्हिडीओ कोणी केला रेकॉर्ड, अत्यंत मोठा खुलासा, राज्यात..

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आलाय. थेट मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक धक्कादायक असा व्हिडीओ पुढे आला. हा व्हायरल व्हिडीओ शासकीय निवासस्थानीतील असल्याची माहिती मिळत आहे. या कथित व्हिडीओत नरहरी झिरवाळ यांच्यासोबत चक्क एक तृतीयपंथी व्यक्ती दिसत आहे.

मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित व्हिडीओ कोणी केला रेकॉर्ड, अत्यंत मोठा खुलासा, राज्यात..
Minister of StaMinister Narahari Jirwalte
| Updated on: Mar 26, 2026 | 11:36 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील राज्याचे अन्न व आैषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडावी. मंत्री नरहरी झिरवाळ आणि तृतीयपंथी व्यक्ती या व्हिडीओमध्ये दिसत आहे. शासकीय निवासस्थानातील हा व्हिडीओ असल्याचे कळतंय. तृतीयपंथी व्यक्ती आणि नरहरी झिरवाळ दोघे बेडवर दिसत आहेत. या कथित व्हिडीओने मोठी खळबळ उडाली. अगदी बेडरूममधील हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने नक्की हा नरहरी झिरवाळ यांचा व्हिडीओ कोणी रेकॉर्ड केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण व्हायरल कथित व्हिडीओत काही गोष्टी रेकॉर्ड झाल्या. यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, मंत्री झिरवाळ, तृतीयपंथी व्यक्ती आणि अजून तिसराही कोणी व्यक्ती यादरम्यान रूममध्ये होता का? आता नुकताच मोठा खुलासा झाला असून हा व्हिडीओ नक्की कोणी रेकॉर्ड केला हे पुढे आलंय. समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल होत असून या कथित व्हिडिओची टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाही.

व्हायरल व्हिडीओबाबत नरहरी झिरवाळ यांनी अगोदरच कल्पना होती. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. मंत्री झिरवाळ यांनी तृतीयपंथी जो झिरवाळ यांच्यासोबत व्हिडीओत दिसत आहे, त्याच्याविरोधात मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

तृतीयपंथी पवन यादव याचा नरहरी झिरवाळ यांच्यासोबत व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर लोकशाही मराठी चॅनलसोबत बोलताना पवन यादव याचा भाऊ रवी यादव याने खुलासा करत थेटपणे सांगितले की, हा व्हायरल होणारा व्हिडीओ नक्की कोणी व्हायरल केला. रवी यादव याने म्हटले की, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ दिसत आहे आणि माझा भाऊ पवन यादव हा आहे. हा व्हिडीओ माझा भाऊ पवन यादव यानेच रेकॉर्ड केला.

तृतीयपंथी पवन यादव याच्यासोबत नरहरी झिरवाळ याने अनेकदा अनैतिक संबंध ठेवल्याचा दावाही रवी यादव याने केला आहे. पवन याला सरकारच्या तृतीयपंथी बोर्डात मोठे पद हवे असल्याने त्याचा आणि झिरवाळचा संबंध आल्याचे रवी यादव यांनी सांगितले. यादरम्यानच रवी यादव यांनी नरहरी झिरवाळ यांच्यावर अजून काही गंभीर आरोप केले आहेत. या कथित व्हायरल व्हिडीओनंतर विरोधक थेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

Follow Us