मोठी बातमी! पुढील दीड महिन्यात राज्यात मोठे फेरबदल? फडणवीस, शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या
सध्या राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याचं पहायला मिळत आहे.

पुढील दीड महिन्यामध्ये राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार आहेत, त्याचा मोठा परिणाम हा राज्याच्या राजाकारणावर होणार असल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांकडून मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याचं देखील पहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यामुळे राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार असल्याच्या या वृत्ताला बळ मिळत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याने केंद्रात आणि राज्यात पुढील दीड महिन्यांमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. वीस जुलैपासून दिल्लीमध्ये संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनानंतर केंद्रातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. केंद्रात होणाऱ्या या बदलाचा परिणाम हा महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत दिल्लीमध्ये असण्यामागे हेच फेरबद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याच्या चर्चेनं राज्याच्या राजकारणात जोर धरला आहे. मात्र फडणवीसांकडून अद्याप त्याबाबत कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीयेत.
तुम्ही दिल्लीला जाणार का असा प्रश्न फडणवीसांना पत्रकारांनी विचारला असता, त्यांनी या प्रश्नाला मिश्किल उत्तर दिलं, मी कालच दिल्लीला जावून आलो असं त्यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान दुसरीकडे असाच प्रश्न एकनाथ शिंदे यांना देखील विचारण्यात आला, तुम्ही मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी देखील मिश्किल उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्रिपदाची व्हॅकन्सी आहे का सध्या? असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळ अजून तरी तसेच स्पष्ट संकेत दोघांकडूनही मिळालेले नाहीयेत. मात्र राज्यात गेल्या काही महिन्यांपासून ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यावरून असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता नेमकं काय घडणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.