भाजप मंत्री रक्षा खडसे यांना मोठा धक्का, हायकोर्टातून मोठी बातमी, आता पुढे काय होणार?

जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

भाजप मंत्री रक्षा खडसे यांना मोठा धक्का, हायकोर्टातून मोठी बातमी, आता पुढे काय होणार?
रक्षा खडसे यांना मोठा धक्का
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 16, 2026 | 6:19 PM

जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. रक्षा खडसे यांनी जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात हायकोर्टामध्ये दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीमध्ये  रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगरच्या आपल्या विरोधातील शिवसेनेच्या दोन उमेदवारांच्या उमेदवारीवर हरकत घेतली होती.  या प्रकरणात त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती.  मात्र त्यांची ही याचिका आता फेटाळावून लावण्यात आली आहे.    रक्षा खडसे विरुद्ध जिल्हा सहकारी संस्था असं या प्रकरणाचं नाव होतं. 13 नोव्हेंबर 2026 रोजी न्यायमूर्ती सचिन एस. देशमुख यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

यामध्ये प्रतिवादींच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, 29 नोव्हेंबर 2026 रोजी मतदान होणार आहे. एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की, त्यात कोर्टाने हस्तक्षेप करू नये, हा कायद्याचा ठरलेला सिद्धांत आहे. नामांकन पत्र चुकीच्या पद्धतीने स्वीकारलं असेल तर त्यासाठी निवडणूक याचिका दाखल करता येते. त्यामुळे कोर्टाने दोन्ही रिट याचिका टिकवता येणार नाहीत, असं सांगत फेटाळून लावल्या. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर योग्य त्या निवडणूक याचिकेद्वारे आव्हान देण्याची मुभा कोर्टाने रक्षा खडसे यांना दिली आहे.

Loading...

म्हणजेच जिल्हा बँकेची निवडणूक ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुक्ताईनगरच्या जागेबाबत विनोद तराळ, दिवानी देशमुख दोन्ही अर्जांबाबत मंत्री रक्षा खडसे यांनी हरकत घेत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.  मात्र हायकोर्टाने रक्ष खडसे यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. यावेळी प्रतिवादींच्या वकिलांकडून हायकोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की, त्यात कोर्टाने हस्तक्षेप करू नये, हा कायद्याचा ठरलेला सिद्धांत आहे. असा युक्तिवाद प्रतिवादींच्या वकिलांकडून करण्यात आला होता. त्यानंतर ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us