मोठी बातमी! राज्यात काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेता सोडणार पक्षाची साथ, भाजपमध्ये होणार पक्षप्रवेश
मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के सुरूच आहेत. आता पुन्हा एकदा भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के सुरूच आहेत. आता पुन्हा एकदा भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. हा काँग्रेस पक्षासाठी तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या तसेच चिखलीच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे शिलेदार असलेले माजी आमदार तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे हे भाजपच्या गळाला लागले असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
राहुल बोंद्रे यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक संधी आणि पदे दिली, तसेच जिवाभावाची अनेक माणसं दिली, असे सांगत बोंद्रे यांनी काँग्रेससोबतच्या आपल्या प्रदीर्घ प्रवासाच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. मुकुल वासनिक यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात करून दिली आणि अत्यंत प्रेम व मार्गदर्शन दिले, तर हर्षवर्धन सपकाळ यांनी भावाप्रमाणे प्रेम दिल्याचेही बोंद्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. मात्र आता राजकीय वळणावर आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राहुल बोंद्रे यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.
सोबतच, काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांना आपण कधीही विसरणार नसल्याचेही त्यांनी भावनिकपणे म्हटले आहे. राहुल बोंद्रे यांच्या या भूमिकेमुळे चिखलीसह बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी महायुतीमधील घटक पक्षात प्रवेश केले आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. दरम्यान त्यानंतर आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी देखील यापूर्वी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.