AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, पण झाला शिंदे गटाचा गेम, राष्ट्रवादीने डाव साधला, राजकारणातून मोठी बातमी

शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा आणखी एक मोठा धक्का पक्षाला बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठा पक्ष प्रवेश झाला आहे. परंतु याचा फटका हा शिवसेना शिंदे गटाला देखील बसण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, पण झाला शिंदे गटाचा गेम, राष्ट्रवादीने डाव साधला, राजकारणातून मोठी बातमी
eknath shinde, uddhav ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 5:05 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमधील घटक पक्षात प्रवेश केला. सर्वाधिक पक्षप्रवेश हे शिवसेना शिंदे गटात झाले आहेत. नुकतंच राज्यात ऑपरेशन टायगर पार पडलं. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी दुसरा सर्वात मोठा धक्का होता. आता शिवसेना ठाकरे गटाकडे अवघे तीनच खासदार शिल्लक आहेत, तर दुसरीकडे मात्र शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे. दरम्यान त्यानंतर आता राज्यात शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. रायगडमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाड विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांना त्यांच्या महाड मतदार संघात शह देण्याची रणनीती सुनील तटकरे यांनी आखली आहे. भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक शिवसेना ठाकरे गटाचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांना गळाला लावलं आहे. ओझर्डे यांनी आज शिवसेना पदाधिकारी आणि सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सुनील तटकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केलं.

रायगड जिल्ह्याचे पालक मंत्रीपद शिवसेनेकडे गेल्यानंतरही जिल्ह्यातील महायुतीमध्ये काहीच अलबेल नसल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे सातत्याने तटकरे कुटुंबियांना टार्गेट करून टीका करत असल्याने, राष्ट्रवादीकडून सुद्धा आता जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असणाऱ्या सोमनाथ ओझर्डे यांना सुनील तटकरें यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश देऊन जिल्ह्यातील शिवसेनेला शह दिला, अशी चर्चा सुरू आहे. सोमनाथ ओझर्डे हे भरत गोगावले यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे, मात्र त्याहीपेक्षा अधिक फटका हा आता शिवसेना शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट