Vikram Kakade: विक्रम काकडे यांना मोठा धक्का! थेट अर्जावर आक्षेप, विधान परिषद निवडणूकीत मोठा ट्विस्ट

Vikram Kakade: विक्रम काकडे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी भरलेल्या अर्जावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. छाननी प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीलाच हा आक्षेप नोंदवला गेल्याने विक्रम काकडे यांच्या उमेदवारीसमोर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Vikram Kakade: विक्रम काकडे यांना मोठा धक्का! थेट अर्जावर आक्षेप, विधान परिषद निवडणूकीत मोठा ट्विस्ट
Vikram Kakade
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 02, 2026 | 12:55 PM

विधान परिषदेच्या सतरा जणांसाठी अर्ज दाखल कालचा अखेरचा दिवस होता. आजपासून अर्जाची छाननी होणार होणार आहे. यापूर्वी विक्रम काकडे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी भरलेल्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हा आक्षेप घेतला आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भेटीला गेले आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुण्याच्या जागेवर श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्याच अनुशंगाने विक्रम काकडे यांच्या अर्जावर मात्र आक्षेप घेण्यात आला आहे.

छाननी प्रक्रियेत अर्जावर आक्षेप

कालपर्यंत अर्ज भरण्याची धांदल उडालेली असताना, आजपासून सुरू झालेल्या छाननी प्रक्रियेत विक्रम काकडे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर थेट आक्षेप नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा आक्षेप शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आला आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भेटीला गेले आहेत. छाननी प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीलाच हा आक्षेप नोंदवला गेल्याने विक्रम काकडे यांच्या उमेदवारीसमोर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काकडे यांच्या अडचणीत वाढ

शरद पवार गटाने नेमका कोणत्या तांत्रिक किंवा कायदेशीर मुद्द्यावर हा आक्षेप घेतला आहे, याचा सविस्तर तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, एका प्रमुख विरोधी पक्षाने थेट अर्जावरच बोट ठेवल्याने विक्रम काकडे यांच्या अडचणीत नक्कीच वाढ झाली आहे. आता निवडणूक निर्णय अधिकारी या आक्षेपावर नेमकी काय सुनावणी घेतात आणि विक्रम काकडे यांचा अर्ज छाननीअंती वैध ठरणार की बाद होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. या नव्या घडामोडीमुळे विधान परिषदेच्या या निवडणुकीतील चुरस आणखीच वाढली आहे.

नुकताच संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. विक्रम काकडे पार्थ पवारांचे मित्र असून त्यांना राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली. पक्ष कार्यालयात सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे दोघेही उमेदवारी अर्ज भरत होते. यावरुन संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. काकडेंना उमेदवारी दिल्यानं टिंगरे समर्थकांनं थेट राजीनामा दिला. त्यानंतर आता विक्रम काकडे यांच्या उमेदवारी अर्जावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. त्यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

Follow Us