AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UNSC : चांगली बातमी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरुपी सदस्यत्वाचं समर्थन करण्यासाठी अजून चार देश आले पुढे

UNSC : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं भारताला कायमस्वरुपी सदस्य मिळावं, त्याचं समर्थन करण्यासाठी अजून चार देश पुढे आले आहेत. भारत गेल्या कित्येक वर्षांपासून त्यासाठी प्रयत्न करत आहे.

UNSC : चांगली बातमी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरुपी सदस्यत्वाचं समर्थन करण्यासाठी अजून चार देश आले पुढे
V4 MeetingImage Credit source: X/Jaishankar
| Updated on: Sep 22, 2026 | 9:10 AM
Share

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावं यासाठी भारत गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. या संदर्भात संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्रादरम्यान न्यू यॉर्कमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि वाइसेग्राड ग्रुपमध्ये पहिली हायलेवल बैठक झाली. जयशंकर यांनी बैठकीच्या पार्श्वभूमीवर स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांची भेट घेतली. त्यांनी UNSC मध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाला समर्थन दिलं. “V4 ची बैठक म्हणजे ऐतिहासिक संधी असल्याचं जयशंकर म्हणाले. ही एक ऐतिहासिक संधी होती. आज आम्हाला इथे बोलावल म्हणून मी मंत्री जुराज यांचे आभार मानतो. ही खूप उपयुक्त बैठक होती” असं एस. जयशंकर म्हणाले. “युरोपियन यूनियन सोबत दृढ संबंध झाले पाहिजेत हे आम्ही ठरवलय. म्हणून V4 सोबत मिळून एका वार्षिक बिझनेस फोरमची स्थापना करणार आहोत. परराष्ट्र मंत्री स्तरावर दरवर्षी बैठक करणार आहोत” असं जयशंकर यांनी सांगितलं.

जयशंकर यांनी एक्सवर V4 बैठकीचे फोटो शेअर केले. “आज दुपारी न्यू यॉर्कमध्ये आपल्या युरोपियन युनियनच्या सहकाऱ्यांना भेटून खूप चांगलं वाटलं #UNGA81. भारत-EU सहकार्य, मल्टीलेटरल मुद्दे, गल्फ, यूक्रेन आणि इंडो-पॅसिफिकसह विद्यमान स्थितीवर चर्चा झाली” असं जयशंकर यांनी लिहिलं आहे. V4 देशांसोबत संरक्षण क्षेत्रात भारताचा एक मजबूत इतिहास राहिला आहे. त्यांना ते सहकार्य पुढे न्यायचं आहे असं जयशंकर यांनी सांगितलं. बैठकीत अवकाश, टेक्नेलॉजी, कनेक्टिविटी, शिक्षण या मुद्यांवर चर्चा झाली. त्या शिवाय युक्रेन संघर्ष आणि आखातातल्या परिस्थिती संदर्भात मोठ्या जागतिक संकटांवर चर्चा झाली.

आम्ही द्विपक्षीय अजेंड्यावर चर्चा केली

V4 बैठकीशिवाय जयशंकर यांनी स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांच्यासोबत सुद्धा महत्वाची बैठक केली. “आज स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांना भेटून आनंद झाला. आम्ही द्विपक्षीय अजेंड्यावर चर्चा केली. त्याशिवाय बहुपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यावर सुद्धा चिंतन केलं” असं जयशंकर यांनी सोशल मीडियावर लिहिलं.

आम्ही सर्व V4 देश सहमत आहोत

भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या पहिल्या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानारने सुद्धा एक मोठ स्टेटमेंट केलं. ग्लोबल साऊथचा भाग आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील एक उदयोन्मुख महाशक्ती म्हणून भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्यत्व मिळालं पाहिजे यावर आम्ही सर्व V4 देश सहमत आहोत असं जुराज ब्लानार म्हणाले.

Follow Us
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला