AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ठाकरे गट, मनसे युतीबाबत सर्वात मोठी बातमी; राज ठाकरेंना किती जागा मिळणार?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, आज अखेर युतीसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गट, मनसे युतीबाबत सर्वात मोठी बातमी; राज ठाकरेंना किती जागा मिळणार?
शिवसेना ठाकरे गट, मनसे युती Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2025 | 3:55 PM
Share

राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रासंदर्भातील जीआर रद्द केल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे वरळीमध्ये आयोजित विजयी मेळाव्यात प्रथमच एकत्र आल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर अनेकदा वेगवेगळ्या कारणा निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेत जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीमध्ये मनसेला 70 च्या आसपास जागा देण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाकडून दर्शवण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.  आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत आणखी काही फेऱ्या होऊन जागा वाटप निश्चित करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे, त्यामुळे सध्या तरी जागा वाटपासंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये कोणताही अधिकृत फॉर्म्यूला ठरलेला नाहीये.

दोन्ही पक्षांकडून जागा वाटपासंदर्भातील चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. मनसे आणि शिवसेना युतीमध्ये मनसेला 70 ते 75 जागा सोडण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाची आहे, अशी माहिती समोर येत आहे, आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मनसेच्या अनेक बैठका पार पडल्या होत्या, त्यामध्ये मनसेकडून 125 जागा लढण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. मात्र आता युतीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून मनसेला 70 ते 75 जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.  एकीकडे मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. काँग्रेसने मनसेसोबत जाण्यास नकार दिला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...