चर्चा तर होणारच ! दुचाकी चोरांनी पोलिसांचे पेट्रोलिंगची दुचाकी केली लंपास, कुठे आणि कशी झाली चोरी?

| Updated on: Jan 09, 2023 | 11:02 AM

नाशिक शहरात सर्वसामान्य वनागरिकांच्या दुचाकी चोरीला जात होत्या पण आता थेट पोलीसांच्या सरकारी बाइकच सुरक्षित नसल्याचे चित्र आहे.

चर्चा तर होणारच ! दुचाकी चोरांनी पोलिसांचे पेट्रोलिंगची दुचाकी केली लंपास, कुठे आणि कशी झाली चोरी?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. दुचाकी चोरीच्या घटना देखील सातत्याने समोर येत आहे. शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नाशिक शहरत पोलीसांनी गस्त वाढवली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून शहरातील चोरांना पकडण्याचा प्लॅन पोलीस करत आहे. मत, त्याच चोरांनी नाशिक शहर पोलिसांना आव्हान दिले आहे. दुचाकीवरुन पेट्रोलिंग केले जाते तीच दुचाकी चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिलं आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे. नाशिक शहर पोलीस एकीकडे दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याच पोलिसांची दुचाकी चोरीला गेल्याने संपूर्ण शहरात चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे पोलीस गेलेल्या सरकारी दुचाकी तरी शोध लावतील का ? याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक शहरातील दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी ॲन्टी व्हेईकल थीफ स्क्वॉड हे पथक अपयशी ठरल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.

गस्तीवर ज्या दुचाकीचा वापर केला जातो त्याच दुचाकीची चोरट्यांनी चोरी केल्याने पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होऊ लागली आहे.

रविवारी नाशिकमध्ये तीन ठिकाणाहून दुचाकी चोरीला गेल्या आहेत, त्यात हवालदार नरेंद्र शिवाजी चौधरी यांना हस्तीसाठी दिलेली दुचाकी चोरीला गेली आहे.

चौधरी यांनी दुचाकी वॉशिंगसाठी दिली होती, आडगाव परिसरात असलेल्या वॉशिंग सेंटरमधून दुचाकी चोरीला कशी गेली याबाबत तपास सुरू आहे

शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीच्या घटना वाढत चालल्या आहे. त्यामुळे शहरात पोलिसांच्याही दुचाकी सुरक्षित नसल्याचे चित्र आहे.