‘…मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्रींच्या ताटात जेवणारा असू दे…,’ काय म्हणाल्या चित्रा वाघ

ज्यांनी कुणी आपल्या कर्तव्यात कसूर केली त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. महिला पोलिस भरती करण्याची मागणी होत आहे. परंतू महिला पोलीसांना भरती केलं तर काय करणार असा सवाल त्यांनी केला आहे.

...मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्रींच्या ताटात जेवणारा असू दे..., काय म्हणाल्या चित्रा वाघ
| Updated on: May 31, 2025 | 5:17 PM

भाजपाच्या फायरब्रांड नेत्या चित्रा वाघ यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील कोणाही सोडले जाणार नाही हे सांगताना त्यांनी पार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या ताटाच जेवणारा जरी माणूस यात असेल तरी त्याला सोडले जाणार नाही अशी डरकाळीच चित्रा वाघ यांनी फोडली आहे.

21 व्या शतकात हरामखोर सासू सासरे

वैष्णवीचे ताटात जेवणारा माणूस असू दे,ताटात जेवणारा माणूस असू दे,सासू सासरे तर मला 21 व्या शतकातील हरामखोर सासू सासरे दिसत आहेत. मला त्याचा प्रचंड संताप येतोय. वैष्णवी हीचा मेल्यानंतरही वनवास संपलेला नाही. बाईच्या नशीबी संघर्ष मेल्यानंतरही आहेच. हरामखोर लांडगे लचके तोडत आहेत. आपली सामाजिक जागृती करण्याचा जबाबदारी आहे. वैष्णवी हगणवे यांच्यानंतरही अनेक केसेस पुढे आलेल्या आहेत. पोलिस आरोपींना पकडत आहेत असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

पूजा तर तीन ते चार महिन्यांची गरोदर होती

वैष्णवी मृत्यू प्रकरणातील एका आरोपीला नेपाळसीमेवरुन पोलीसांनी पकडून आणले आहे. त्याबद्दल त्या म्हणाल्या पोलीस आरोपींना पकडून आणण्याचं काम करत आहेत. आणखी एक हुंडाबळी पूजा हीला तर गरोदर असताना आपला जीव गमावावा लागला आहे. ती तीन ते चार महिन्याची गरोदर होती असेही वाघ यांनी म्हटले आहे.

कुटुंबियांनी जे वकीलांना सांगितलं त्यांच्यावर कारवाई होणार आहे. आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा होणार आहे. सुपेकर यांची दुसरीकडे बदली करण्यात येणार आहे.वैष्णवी प्रकरणातील मारेक-यांना शिक्षा होईल. वैष्णवी मेल्यानंतरही तिचे लचके तोडायचं आहेत. वैष्णवीचा वनवास संपलेला आहे. आपण सामाजिक जागृती करण्याची गरज आहे. वैष्णवी हगवणे यांच्यानंतर अनेक केसेस पुढे आलेल्या आहेत.

मयुरी जगताप प्रकरणात महिला आयोग नाही तर इतर यंत्रणांची चौकशी व्हायला पाहिजे. पोलिस , महिला आयोग , भरोसा सेल असेल कुणीही कसूर केली असेल तरी कारवाई होणारच. महिला आयोगाने जर कारवाई केली नाही तरी त्यांच्यावर कारवाई होईल असेही वाघ यांनी म्हटले आहे.

ताटात जेवणारा माणूस असू दे…त्यालाही…

मुख्यमंत्र्यांकडून महिला आयोगाने या प्रकरणात नेमकं काय केले त्यांची चौकशी केली जाईल. त्यानंतर महिला आयोगाची चौकशी होणार आहे, हे देवाभाऊ कोणालाच सोडणार नाहीत. मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्र्यांच्या ताटात जेवणारा माणूस असू दे, त्याची चूक झाली असेल तर तो गजाआड जाईल असेच रूपाली चाकणकर याचं नाव न घेता चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

मला खूप सारे मेसेज येत आहेत

हे देवाभाऊचं सरकार आहे, कोणालाही सोडणार नाही. यात एकाचा बळी केलेला आहे. वैष्णवी असो वा गुजराती असेल तर सर्वांना न्याय मिळावा. खूप सारे मेसेज मला येत आहेत. मला फोन देखील येत आहेत, त्यामुळे कोणालाच सोडले जाणार नाही असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us