AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : IG जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात ज्यांच्यावर नेहमीच आरोप होत आले होते,त्या पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : IG जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
Vaishnavi Hagavane death case: IG Jalindar Supekar transferred to Home Guard
| Updated on: May 31, 2025 | 7:21 AM
Share

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अखेर IG जालिंदर सुपेकरांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जालिंदर सुपेकर यांची आता उपमहासमादेशक होमगार्ड पदावर बदली झाली आहे. या प्रकरणातील आरोपी शशांक हगवणे यांचे ते मामा लागत असून त्यांना दिलेल्या शस्रपरवान्यावर सुपेकर यांची सही असल्याचे उघडकीस आले होते. सुपेकर यांचे अतिरिक्त पदभार कालच काढण्यात आले असताना आज त्यांची थेट आयजी ( पोलीस महानिरीक्षक ) पदावरून  होमगार्डमध्ये बदली करण्यात आली आहे.  त्यामुळे सुपेकर यांनी डबल फटका बसला आहे.

आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर गृहविभागानेही कालच मोठी कारवाई केली होती.  जालिंदर सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला होता. त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला होता. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपांनंतर जालिंदर सुपेकर यांचे हे अतिरिक्त कार्यभार काढले होते. जालिंदर सुपेकर हे वैष्णवी यांचे पती शशांक हगवणे याचे मामा लागतात.

सुरुवातीपासून आरोप झाले

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांवरही सुरुवातीपासून आरोप झाले होते. या आरोपानंतर या प्रकरणात आरोपींनी पोलीसांची काही मदत असेल तर  चौकशी केली जाईल कोणालाही सोडलं जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. या प्रकरणात हगवणे बंधूंना शस्र परवाना देताना नियमबाह्यपणे दिल्याचा ठपका आयजी जालिंदर सुपेकर यांच्यावर होता. त्यांच्या अर्जावर आयजी जालींदर सुपेकर यांची सही होती. शिवाय ते हगवणे बंंधूंचे मामा लागत होते असे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांची आयजी पदावरुन उचल बांगडी करण्यात  आली आहे. आता त्यांना होमगार्डचे उपमहासमादेशक म्हणून साईड पोस्टींग दिल्याचे म्हटले जात आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे वैष्णवी हगवणे या गुहिणीने सासरच्या जाचाला कंठाळून १६ मे रोजी राहत्या घरी गळफास घेतला होता. त्यानंतर या प्रकरणातील कौटुंबिक अत्याचार आणि वैष्णवीचा झालेल्या छळ जगासमोर आल्याने अवघा   महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती आणि सासु, सासरे आणि नणंद, दीर अशा सर्वांनाच अटक झाली आहे.

मित्र निलेश चव्हाण यालाही अटक

वैष्णवी यांचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तर वैष्णवी यांचा दीर सुशील हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे यांची रवानगी  पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. आज वैष्णवी यांच्या मुलाला त्यांच्यापासून वेगळे करणारा तिच्या नवऱ्याचा मित्र निलेश चव्हाण याला नेपाळवरुन अटक झाली आहे. निलेश या गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या पत्नीनेच बेडरुममध्ये सीसीटीव्ही लपवल्याचा गुन्हा दाखल आहे

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.