AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैष्णवी मृत्यूप्रकरण: पोलिसांचा हलगर्जीपणा असेल तर कारवाई करु, गिरीश महाजन यांचे आश्वासन

मलाही दोन मुली आहेत फोटो पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले असे गिरीश महाजन यावेळी म्हणाले. हगवणेना फाशी झाली पाहिजे. जालिंदर सुपेकर यांच्याविषयी काही तक्रार असेल आणि त्याबाबत काही पुरावे असतील तर कारवाई केली जाईल असेही महाजन म्हणाले.

वैष्णवी मृत्यूप्रकरण: पोलिसांचा हलगर्जीपणा असेल तर कारवाई करु, गिरीश महाजन यांचे आश्वासन
Follow us
| Updated on: May 30, 2025 | 9:36 PM

पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे यांनी १६ मे रोजी निवासस्थानी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याच्या घटनेनंतर जे वास्तव समोर आले आहे त्याने अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या प्रकरणात सासरे आणि दीराला अटक झाली आहे. या प्रकरणातील दुर्दैवी मुलीचे पालक अनिल कस्पटे कुटुंबियांशी मंत्री गिरीश महाजन यांनी आज फोनवरुन विचारपूस करीत त्यांना दिलासा दिला. या प्रकरणात पोलिसांनी काही हलगर्जीपणा केला असेल तर त्यांच्यावरही चौकशीअंती कारवाई होईल असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

गिरीश महाजन यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. वैष्णवीचा ज्या पद्धतीने छळ केला, 50 लाख दे नाहीतर भावांना मारून टाकू असं तिला धमकावण्यात आले होते. हे सर्व पुरोगामी महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. या संदर्भात आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.राजेश कावेडिया यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी केलेली मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचेही महाजन यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणात मागचे सगळे गुन्हे पाहून पोलिसांनी हगवणे यांना ताकीद दिली होती.लहान मुलाला घेऊन गेलेला चव्हाण फरार आहे तो आज उद्या सापडेल. मुख्यमंत्र्यांशी कस्पटे यांचे बोलणं करून दिलेले आहे. कोणत्याही परिस्थित कोणीही यातून सुटणार नाही. दोषींवर अतिशय कडक कारवाई केली जाईल.पोलिसांवर जे आरोप झालेत त्याची चौकशी केली जाईल कोणालाही सोडलं जाणार नाही. मागचे सगळे गुन्हे पाहून पोलिसांकडून हगवणे यांना ताकीत देण्यात आली होती. त्यांचा हा धंदा होता ही विकृती आहे. यापुढचा तपास योग्य दिशेने सुरु आहे.

पहलगामच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 'त्या' दोघांना NIA कडून बेड्या
पहलगामच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 'त्या' दोघांना NIA कडून बेड्या.
माळेगाव साखर कारखाना निवडणूक; अजित पवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न
माळेगाव साखर कारखाना निवडणूक; अजित पवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न.
कर्जमाफी अन लाडक्या बहिणींचे 2100 कधी मिळणार? राऊतांनी महायुतीला घेरलं
कर्जमाफी अन लाडक्या बहिणींचे 2100 कधी मिळणार? राऊतांनी महायुतीला घेरलं.
येड्या गबाळ्या सारखं काहीही म्हणेल, त्याला.. ; राऊतांचा पलटवार
येड्या गबाळ्या सारखं काहीही म्हणेल, त्याला.. ; राऊतांचा पलटवार.
गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; दुतोंड्या मारोती गुडघ्यापर्यंत पाण्यात
गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; दुतोंड्या मारोती गुडघ्यापर्यंत पाण्यात.
राज्यात पावसाचं थैमान, मुंबई-महाराष्ट्राला IMD चा अलर्ट, 4 दिवसांत...
राज्यात पावसाचं थैमान, मुंबई-महाराष्ट्राला IMD चा अलर्ट, 4 दिवसांत....
ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर घास..., मनसेचा राऊतांवर निशाणा
ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर घास..., मनसेचा राऊतांवर निशाणा.
माळेगाव कारखान्यासाठी मतदान सुरू, दादा चेअरमन होणार? कोण मारणार बाजी?
माळेगाव कारखान्यासाठी मतदान सुरू, दादा चेअरमन होणार? कोण मारणार बाजी?.
लोकाना स्ट्रेस फ्री करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाचंच टोकाचं पाऊल, कारण...
लोकाना स्ट्रेस फ्री करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाचंच टोकाचं पाऊल, कारण....
मनसेला एकत्र यायचंय की नाही? ठाकरेंची सेना पॉझिटिव्ह पण मनसेला शंका
मनसेला एकत्र यायचंय की नाही? ठाकरेंची सेना पॉझिटिव्ह पण मनसेला शंका.