सॅफ्रन प्रकल्प महाराष्ट्रातून आता नाही तर केव्हा हैदराबादला गेला? भाजपकडून पहिली प्रतिक्रिया

शिंदे-फडणवीस सरकारमुळे सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला गेला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. विरोधकांच्या या आरोपाला आता सत्ताधारी भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे

सॅफ्रन प्रकल्प महाराष्ट्रातून आता नाही तर केव्हा हैदराबादला गेला? भाजपकडून पहिली प्रतिक्रिया
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 8:59 PM

मुंबई : राज्य सरकारमुळे वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस यांच्या पाठोपाठ सॅफ्रन प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. सॅफ्रन हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यातील मिहान येथे प्रस्तावित होता. पण शिंदे-फडणवीस सरकारमुळे हा प्रकल्प हैदराबादला गेला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. विरोधकांच्या या आरोपांना आता सत्ताधारी भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी सॅफ्रन प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातच हैदराबादला गेला होता. मार्च 2021 मध्ये सॅफ्रनची हैदराबादमध्ये कंपनी तयार झाली होती, असा दावा केला आहे.

“महाराष्ट्रातून उद्योग पळवले जात आहेत, अशी हाकाटी विरोधक मारत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये खोटी माहिती पसरवण्याचं पाप करु नका. जो सॅफ्रन उद्योग महाराष्ट्रातून गेला अशी आज बोंब मारली जातेय तो उद्योग मार्च 2021 मध्येच हैदराबादला सॅफ्रॉनची फॅक्ट्री तयार झाली होती”, असं केशव उपाध्याय म्हणाले.

“त्यावेळी मुख्यमंत्री कोण होतं? महाविकास आघाडीचं सरकार होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मग माफी कुणी मागितली पाहिजे? कुणाच्या काळात हा प्रकल्प मागे गेला? जुलै 2022 मध्ये तिथे मेंटेनन्सचं ओव्हरहोल तयार झालं होतं. तिथे काम सुरु झालं होतं आणि तुम्ही आज ओरड करत आहात?”, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

“अशा पद्धतीने खोट्या अफवा पसरवणं महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं नाही. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. तुमच्या कार्यकाळात महाराष्ट्रात एकही प्रकल्प आला नाही. उलट आले ते प्रकल्प गेले. यासाठी मविआने मागितली पाहिजे, ही आमची मागणी आहे”, अशी भूमिका केशव उपाध्याय यांनी मांडली.

Non Stop LIVE Update
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.