Bangladesh vs Nepal Live Streaming: बांगलादेश विरुद्ध नेपाळ भिडणार, कोण जिंकणार?

Bangladesh vs Nepal T20 World Cup 2024 Live Match Score: बांगलादेश विरुद्ध नेपाळ या दोन्ही संघांचा हा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील शेवटचा सामना असणार आहे.

Bangladesh vs Nepal Live Streaming: बांगलादेश विरुद्ध नेपाळ भिडणार, कोण जिंकणार?
Bangladesh vs Nepal
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 12:26 AM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 37 व्या सामन्यात डी ग्रुपमधील बांगलादेश विरुद्ध नेपाळ आमनेसामने असणार आहेत. बांगलादेश आणि नेपाळ या दोन्ही संघांचा हा चौथा आणि शेवटचा सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचा मोहिमेचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. रोहित पौडेल याच्याकडे नेपाळच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर नजमूल हुसैन शांतो बांगलादेशची धुरा सांभाळणार आहे. बांगलादेश हा सामना जिंकून सुपर 8 चं तिकीट निश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच नेदरलँड्सला सुपर 8 मध्ये पोहचायचं असेल, तर नेपाळची मदत लागणार आहे. नेपाळने हा सामना जिंकला, तरच नेदरलँड्स सुपर 8 मध्ये पोहचू शकते. त्यामुळे नेपाळची कामगिरी ही निर्णायक ठरणार आहे.

नेपाळला या स्पर्धेत पहिल्या 3 सामन्यापैकी एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे नेपाळचा जाता जाता विजयाने शेवट करण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच नेपाळने सामना जिंकल्यास नेदरलँड्सलाही मदत होईल. त्यामुळे नेपाळच्या हातात स्वत:च्या अस्तित्वासह नेदरलँड्सचं भवितव्यही आहे. अशात बांगलादेश विरुद्ध नेपाळ सामना कधी आणि कुठे होणार? हे आपण जाणून घेऊयात.

बांगलादेश विरुद्ध नेपाळ सामना केव्हा?

बांगलादेश विरुद्ध नेपाळ सामना सोमवारी 17 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

बांगलादेश विरुद्ध नेपाळ सामना कुठे?

बांगलादेश विरुद्ध नेपाळ सामना अर्नोस व्हॅले ग्राउंड, किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट येथे आयोजित करण्यात आला आहे.

बांगलादेश विरुद्ध नेपाळ सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

बांगलादेश विरुद्ध नेपाळ सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरुवात होईल. तर 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

बांगलादेश विरुद्ध नेपाळ सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

बांगलादेश विरुद्ध नेपाळ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

बांगलादेश विरुद्ध नेपाळ सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

बांगलादेश विरुद्ध नेपाळ सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी बांगलादेश क्रिकेट टीम : नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), तस्कीन अहमद (उपकर्णधार), लिटॉन दास, सौम्य सरकार, तंजिद हसन, शाकिब अल हसन, तॉहिद हृदोय, महमूदुल्लाह, जाकेर अली, तनवीर इस्लाम, मेहदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, शॉरिफुल इस्लाम आणि तंजिम हसन.

टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी नेपाळ टीम : रोहित पौडेल (कर्णधार), आसिफ शेख, अनिल कुमार साह, कुशल भुरटेल, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा, सागर ढकल आणि कमल सिंग आयरी.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...