Full Time Girlfriend: फुल टाईम गर्लफ्रेंडसाठी नोकरी! पाहता पाहता लिंक्डइनवर इतक्या जणींचा लागलीच अर्ज
Job for a Full Time Girlfriend: जगात केव्हा काय होईल सांगता येत नाही. गुरुग्रामच्या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर पूर्णवेळ मैत्रिण हवी असल्याची पोस्ट केली आणि पाहता पाहता त्यावर तरुणींच्या उड्या पडल्या. इतक्या जणींनी लागलीच अर्ज ही केला.

26 Applicants applied on LinkedIn: गुरुग्राममधील एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर पूर्णवेळ मैत्रिण (Full Time Girlfriend) हवी अशी जाहिरात पोस्ट केली. ही जाहिरात अवघ्या काही वेळात व्हायरल झाली आणि पाहता पाहता या जाहिरातीसाठी 26 मुलींनी अर्ज सुद्धा केला. या पोस्टची सध्या एकच चर्चा सुरू आहे. ही पोस्ट पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तर त्यावर अनेक मुलींनी अर्ज सुद्धा केला हे पाहुन अनेकांनी डोके धरले आहे. ही पोस्ट नंतर रेडिटवर पण शेअर करण्यात आली. तिथे लिंक्डइनचा स्क्रीनशॉट एकदम व्हायरल झाला आहे.
हायब्रिड जॉबचे सत्य काय?
ही पोस्ट एकदम प्रोफेशनल नोकरीच्या जाहिरातीसारखी तयार करण्यात आली आहे. या पोस्टसाठी गुरुग्राम हे नोकरीचे ठिकाण लिहिण्यात आले आहे. येथे हायब्रिड वर्कचा पर्याय देण्यात आला आहे. या पोस्टवर ईझी अप्लायचा पर्याय देण्यात आला आहे. तर गर्लफ्रेंड म्हणून काय काय जबाबदारी पूर्ण कराव्या लागतील, याची यादी देण्यात आली आहे. पहिल्या नजरेत तर ही एक सामान्य कॉर्पोरेट जॉब जाहिरात वाटत होती.
गर्लफ्रेंडच्या जबाबदाऱ्या काय?
या पोस्टनुसार, गर्लफ्रेंडला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. तिला नोकरी देणाऱ्याशी भावनिक नाते जपावे लागेल. तिला दिलखुलास बोलता यायला हवे. तिला कायम सोबत राहावे लागेल. सन्मान द्यावा लागेल. तिला तिच्या मनातील भावना व्यक्त कराव्या लागतील. त्यासोबतच तिला कॉर्पोरेट स्टाईलनेही राहावे लागेल.

गर्लफ्रेंडसाठी जॉब
या तरुणीला समजून घेता यायला हवे. सोबतच तिची आकलन क्षमता आणि ऐकून घेण्याची क्षमती ही चांगली हवी. सहानुभूती, इमानदारी आणि विनोद बुद्धीची पण चुणूक तिला हवी तिला दोघांचे नाते संतुलीत ठेवण्याची जबाबदारी पण पूर्ण करता यायला हवी अशा काही अटी देण्यात आल्या आहेत.
अर्थात अनेकांनी या पोस्टवर चांगलंच तोंडसूख घेतलं आहे. आजकाल नोकरी, लग्न आणि डेटिंगचे सरमिसळ झाल्याचा चिमटा काहींनी काढला आहे. अर्थात गंमतीत लिहिलेल्या एका पोस्टमध्ये नात्याविषयीची पूर्ण यादीच देण्यात आली आहे. या पोस्टची भाषा पूर्णपणे व्यावसायिक आहे.
