PAK vs IRE: शाहिनची निर्णायक खेळी, पाकिस्तानचा आयर्लंडवर 3 विकेट्सने कसाबसा विजय
Pakistan vs Ireland Match Highlights In Marathi: आयर्लंडने 2009 च्या विश्वविजेत्या पाकिस्तानला विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं होतं.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 36 व्या सामन्यात ए ग्रुपमधील पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड आमनेसामने होते. हा सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे आयोजित करण्यात आला होता. चुरशीच्या झालेल्या सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडवर कसाबसा 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. आयर्लंडने विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानला हे आव्हान पूर्ण करण्यासाठी 7 विकेट्स गमवाव्या लागल्या. तसेच 18.5 ओव्हरचा सामना करावा लागला. पाकिस्तानने यासह वर्ल्ड कप मोहिमेतील शेवट विजयाने केला. पाकिस्तानचा हा दुसरा विजय ठरला. तर आयर्लंडची पाटी कोरीच राहिली.
आयर्लंडची बॅटिंग
दरम्यान त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून आयर्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार सुरुवात करत आयर्लंडच्या डावाला सुरुंग लावला. आयर्लंडचा अर्धा संघ 32 धावांवर माघारी पाठवला. मात्र त्यानंतर आयर्लंडच्या काही फलंदाजांनी छोटेखानी पण निर्णायक खेळी केली, ज्यामुळे 100 पार पोहचता आलं. जॉर्ज डॉकरेल 11, गॅरेथ डेलेनी 31, मार्क एडेअर 15 आणि बॅरी मॅककार्थी याने 2 धावा केल्या. तर जोशुआ लिटील आणि बेंजामिन व्हाईट ही जोडी नॉट आऊट राहिली. जोशुआने 22 आणि बेंजामिनने 5 धावा जोडल्या. तर पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी आणि इमाद वसिम या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद आमिरने दोघांना आऊट केलं. तसेच हरीस रौफला 1 विकेट मिळाली.
आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सॅम अयुब, फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, अब्बास आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद अमीर.