PAK vs IRE: पाकिस्तानच्या विजयानंतर कॅप्टन बाबर टीम इंडियाबाबत काय म्हणाला?

Babar Azam Pakistan vs Ireland: पाकिस्तानने विजय मिळवला खरा, पण त्यांना आयर्लंडने चांगलं झुंजवलं. पाकिस्तानच्या या विजयानंतर कॅप्टन बाबर आझमने काय म्हटलं?

PAK vs IRE: पाकिस्तानच्या विजयानंतर कॅप्टन बाबर टीम इंडियाबाबत काय म्हणाला?
babar azam pakistan
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 1:05 AM

बाबर आझम याच्या नेतृत्वात पाकिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 मोहिमेचा शेवट रडतपडत का होईना पण गोड केला आहे. या स्पर्धेतील 36 व्या सामन्यात पाकिस्तासमोर आपल्याच ए ग्रुपमधील आयर्लंड या संघाचं आव्हान होतं. पाकिस्तानने आयर्लंडला धारदार बॉलिंगच्या जोरावर 106 धावांवर रोखल्याने 107 धावांचं आव्हान मिळालं. मात्र आयर्लंडने पाकिस्तानला या धावा करण्यासाठी चांगलाच घाम फोडला. पाकिस्तानचा अखेरच्या क्षणी विजय झाला. पाकिस्तानने 18.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून हे विजयी आव्हान पूर्ण केलं. पाकिस्तानचा हा दुसरा विजय ठरला. पाकिस्तानच्या या विजयानंतर कॅप्टन बाबर आझमने टीम इंडिया आणि यूएसए या 2 संघांचा उल्लेख केला. पाकिस्तानला या दोन्ही संघांविरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. बाबर आयर्लंड विरुद्ध विजयानंतर काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.

बाबर आझम काय म्हणाला?

“आम्ही चांगली कामगिरी केली, आम्ही लवकर विकेट्स घेतल्या. फलंदाजीत आमची चांगली कामगिरी झाली नाही, पण आम्ही शेपटीच्या खेळाडूंच्या मदतीने बाजी मारली. आमच्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थिती असल्याने गोलंदाजी चांगली होती. फलंदाजी करताना आम्ही काही चुका केल्या, आम्हाला अमेरिका आणि भारताविरुद्ध जिंकण्याची संधी होती”, असं म्हणत बाबर आझमने मागचं पुढचं सर्व म्हटलं.

पाकिस्तानची कामगिरी

दरम्यान पाकिस्तानने या स्पर्धेतील 4 पैकी 2 सामने जिंकले. तर 2 सामन्यात त्यांना पराभूत व्हावं लागलं. पाकिस्तानला सलामीच्या सामन्यात यजमान यूएसएने सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं. त्यानंतर टीम इंडियाने 6 धावांनी धुव्वा उडवला. मात्र त्यानंतर पाकिस्तानने कॅनडा आणि आयर्लंडवर विजय मिळवला.

आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सॅम अयुब, फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, अब्बास आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद अमीर.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.