अजित पवारांच्या मामांसह त्यांच्या अवतीभोवती असलेल्यांची चौकशी होणार, 4 दिवसांत 4 ठिकाणी प्रकरणं बाहेर येणार; सोमय्यांच्या दाव्यांचा चौकार

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पु्न्हा एकदा दाव्या-प्रतिदाव्यांची लड लावून, दिवाळीनंतरही राजकीय वातावरण तापते ठेवलंय. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मामांची चौकशी होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.

अजित पवारांच्या मामांसह त्यांच्या अवतीभोवती असलेल्यांची चौकशी होणार, 4 दिवसांत 4 ठिकाणी प्रकरणं बाहेर येणार; सोमय्यांच्या दाव्यांचा चौकार
किरीट सोमय्या आणि अजित पवार.
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 1:27 PM

मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पु्न्हा एकदा दाव्या-प्रतिदाव्यांची लड लावून, दिवाळीनंतरही राजकीय वातावरण तापते ठेवलंय. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मामांची चौकशी होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळं पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू होणारयत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीच्या कारवायांनी जोर पकडलाय. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जणू वैर असल्याचे चित्र त्यामुळं समोर येतंय. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांनी रविवारी अनेक दावे करून, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय रंगत वाढवलीय. सोमय्या म्हणाले की, येणाऱ्या 4 दिवसांत 4 ठिकाणी राज्याच्या नेत्यांची प्रकरणं बाहेर येणारयत. या ठिकाणी ईडी कारवाया करेल. तपास यंत्रणा कारवाई करतील. त्यात अजित पवार यांचे मामा आणि बिझनेस पार्टनर यांचीही चौकशी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी नवाब मलिकांना लक्ष्य केलं. ते म्हणाले, नवाब मलिकांना आत्ता जाग आली का ? वक्फ बोर्डाच्या घोटाळ्यांचा सगळा तपास पूर्ण होणार आहे. येत्या दोन ते चार दिवसांत अजित पवारांच्या अवतीभोवती असलेल्या सगळ्यांच्या चौकशा होणार आहे, असा दावा त्यांनी केला.

राज्यातल्या हिंसाचारावरही सोमय्यांनी वक्तव्य केलं. ते म्हणाले, शिवसेनेचा नेता नांदेडमध्ये भाषण करतो. रझा अकादमीच्या एकाही नेत्याची अटक का नाही ? जे मोर्चे निघाले ते काय आरएसएसनं काढले ? हिंदू हा मुद्दा यांच्यासाठी राहिला नाही. छत्रपतींचा महाराष्ट्र हे मान्य करणार नाही. हिंदूंची दुकाने तोडली आणि जाळली. मात्र, हे संजय राऊतांना दिसत नाही. सुमित ठक्करनं ठाकरे सरकारचा घेटाळा काढला, तर १० दिवस तुरूंगात. मात्र, मोर्चे काढणारे मोकळे. हे धंदे चालणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

येणाऱ्या 4 दिवसांत 4 ठिकाणी राज्याच्या नेत्यांची प्रकरणं बाहेर येणारयत. या ठिकाणी ईडी कारवाया करेल. तपास यंत्रणा कारवाई करतील. त्यात अजित पवार यांचे मामा आणि बिझनेस पार्टनर यांचीही चौकशी होईल. वक्फ बोर्डाच्या घोटाळ्यांचा सगळा तपास पूर्ण होणारय.
– किरीट सोमय्या, भाजप नेते

(BJP leader Kirit Somaiya claims that ED will probe Ajit Pawar’s uncle and those around him)

इतर बातम्याः

राजकारण पेटलेः 93 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का, चंद्रकांत पाटलांचा सवाल

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही, चंद्रकांत पाटील यांचे खोचक वक्तव्य