Nitesh Rane : ‘हिम्मत असेल तर असं ईदच्या आधी बोलून दाखवा’, नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

Nitesh Rane : हिंदुंच्या सणांना का बदनाम केलं जातय? मुस्लिमांच्या कार्यक्रमात इतरांना परवानगी नसते तसचं दांडियाच्या कार्यक्रमात मुस्लिमांना परवानगी नकोच असं नितेश राणे म्हणाले.

Nitesh Rane : हिम्मत असेल तर असं ईदच्या आधी बोलून दाखवा, नितेश राणेंचं ओपन चॅलेंज
Nitesh Rane
| Updated on: Sep 08, 2026 | 12:16 PM

भाजप नेते नितेश राणे यांनी आज डीजे बंदीच्या मुद्यावर बोलताना आक्रमकपणे भूमिका मांडली. “किती मुल्ला,मौलवी महिलांबद्दल बोलताना अपशब्द बोलतात. महिला, बायकांचा उल्लेख करतात. तुम्ही जिहाद केला, तर मेल्यानंतर 72 हूर भेटतील, त्यासाठी तु्म्ही जिहाद करा. असं आव्हान करणाऱ्या लोकांवर का कोणी बोलण्याची हिम्मत करत नाही” असा सवाल नितेश राणे यांनी विचारला. “सर्वच आमच्या हिंदू धर्माच्या संतांबद्दल, त्यांना का बदनाम केलं जातय. आमच्या सनातन हिंदू धर्माला बदनाम करताय. आमच्या सणासुदीला भितीचं वातावरण निर्माण करता. हिम्मत असेल तर ईदच्या आधी बोलून दाखवा” असं नितेश राणे म्हणाले.

“हिंदुंच्या सणांना का बदनाम केलं जातय? मुस्लिमांच्या कार्यक्रमात इतरांना परवानगी नसते तसचं दांडियाच्या कार्यक्रमात मुस्लिमांना परवानगी नकोच” असं नितेश राणे म्हणाले. “जिहादी गरब्याच्या कार्यक्रमात जाण्यासाठी काहीही नाव सांगतो. डीजेचा त्रास सगळ्यांना होत असेल, तर ईद, हिंदू सणांना बंद झालाच पाहिजे” अशी भूमिका नेतश राणे यांनी मांडली.

त्यापेक्षा इस्लामबद्दल, कुराणबद्दल बोलण्याची हिम्मत करा

“जिहाद करा, मेल्यानंतर 72 हूर भेटतील हे मोजायला गेले होते का? म्हणून सनातन हिंदू धर्माला टार्गेट करुन बदनाम करण्याचा जो कार्यक्रम सुरु आहे, कोण तिथे जोहरबद्दल बोलतं, कोणी आमच्या धर्मगुरुंबद्दल बोलणार. सगळे सल्ले हिंदू धर्मालाच देतायत. त्यापेक्षा इस्लामबद्दल, कुराणबद्दल बोलण्याची हिम्मत करा. जे बोलण्याची हिम्मत आमच्या हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती” असं नितेश राणे म्हणाले.

ईदच्या जुलूसवेळी डीजे वाजवायचा नाही

डीजे बंदीच्या मागणीवर नितेश राणे म्हणाले की, “डीजे ईदला वाजत नाही का?. सगळ्यांची जर भावना आहे की, डीजे बंद झाला पाहिजे तर आदरणीय फडणवीस साहेबांनी सांस्कृतिक पद्धतीने सण साजरा करण्याची भूमिका मांडली आहे” “हिंदू सणांच्यावेळी डीजे बंद होत असेल तर ईदला पण बंद झाला पाहिजे. एकाने पण ईदच्या जुलूसवेळी डीजे वाजवायचा नाही” अशी भूमिका नितेश राणे यांनी मांडली.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us