AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपचा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का? त्या एका निर्णयामुळे महायुतीत बिघाडीची शक्यता

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा एक दिवस शिल्लक आहे. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला देखील ठरला आहे. मात्र त्यानंतर राजकारणात मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.

मोठी बातमी! भाजपचा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का? त्या एका निर्णयामुळे महायुतीत बिघाडीची शक्यता
महायुतीमध्ये बिघाडी? Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 31, 2026 | 3:10 PM
Share

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. एक जून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. जागा वाटपावरून महायुतीमध्ये गेले अनेक दिवस चर्चेचं गुऱ्हाळ चालू होतं. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला काही केल्या निश्चित होत नव्हता. मात्र अखेर आता जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजप विधान परिषदेच्या 11 जागा लढवणार आहे. तर शिवसेना चार आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 2 जागा लढवणार आहे.  शिवसेना शिंदे गट 6 जागांवर ठाम असल्यामुळे जागा वाटप लांबल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 6 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 3 जागांची मागणी करण्यात आली होती.

मात्र अखेर आता जागा  वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, भाजप 11, शिवसेना शिंदे गट 4 आणि अजित पवार गट 2 जागा लढवणार आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद अधिक असल्यामुळे भाजपने 14 जागा लढवाव्यात अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून सुरू होती, मात्र भाजपने युती धर्म पाळत शिवसेना शिंदे गटाला 4 जागा दिल्या आहेत.

मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर आता यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे. मात्र तरी देखील या जागेसाठी आता  भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, यावरून आता चर्चेला उधाण आलं आहे. यवतमाळमध्ये भाजप -शिवसेनेमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून सूचना आल्याने उमेदवारी दाखल करणार असल्याचं यावेळी भुतडा यांनी स्पष्ट केलं आहे.  जर मला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं तर मी परत घेईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. मी बंडखोरी करत नाही, पक्षाचा आदेश आहे तो पूर्ण करत आहे, असं यावेळी भुतडा यांनी म्हटलं आहे. दरम्यान नितीन भुतडा यांच्या उमेदवारीमुळे आता महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट