Disha Salian Case : माझ्या मनात संशय येतो की, संजय राऊतच हे कुठे…दिशा सालियन प्रकरणात भाजपं नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

"सकाळची आरती झाली की, संध्याकाळची आरती कधी होते, नैवैद्य कधी दाखवतो इथपर्यंत आनंद असतो. लोकमान्य टिळकांचे आभार मानले पाहिजेत. सर्व लोक एकत्र आले पाहिजेत. उत्सव सुरु झाला, विचार मोठा झाला पाहिजे. आज हा उत्सव मुंबईत, महाराष्ट्रात देशात नव्हे जगभरात उत्सव प्रसिद्ध झाला. सर्व एकत्र येण्याची प्रथा, परंपरा सुरु झाली. म्हणून बाप्पााच्या चरणी प्रार्थना" असं प्रसाद लाड म्हणाले.

Disha Salian Case : माझ्या मनात संशय येतो की, संजय राऊतच हे कुठे...दिशा सालियन प्रकरणात भाजपं नेत्याचं धक्कादायक वक्तव्य
Sanjay Raut
| Updated on: Sep 20, 2026 | 5:45 PM

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी : दिशा सालियन प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव आलं आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. खासदार संजय राऊत सतत या विषयावर बोलत आहेत. आज भाजपं नेते प्रसाद लाड यांनी एक दुसरी शंका व्यक्त केली.दिशाचे वडिल सतीश सालियन म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या माणसाकडून त्रास दिला जातोय. संजय राऊत म्हणातात की, दिशा सालियनच्या वडिलांकडून तमाशा सुरु आहे. या प्रश्नावर प्रसाद लाड यांनी उत्तर दिलं.  “खरंतर या विषयात मला बोलायचं नाहीय. परंतु जे चाललय, ज्या पद्धतीने मिडिया ट्रायल दोन्ही पक्षांकडून सुरु आहे. त्यापेक्षा सत्य परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. आज गुन्हा दाखल केला, उद्या अटक असं नाहीय. पण सत्याला सामोरं गेलं पाहिजे. अशा गोष्टी आमच्या जीवनात देखील घडल्या” असं प्रसाद लाड म्हणाले.

“सत्य कधी खोटं पडत नाही. आदित्य ठाकरेंनी सत्याला सामोरं गेलं पाहिजे. सीबीआय चौकशीला उत्तर दिलं पाहिजे. संजय राऊत सतत बोलून घाण करतायत. संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी थांबवलं पाहिजे. संजय राऊत बोलले की, त्यावर दहा लोक बोलतात. माझ्या मनात संशय आहे की, संजय राऊतच हे कुठे चिघळवतायत की काय?. संजय राऊतांना आदित्य ठाकरेंना अडचणीत आणून स्वत:ला शिवसेना प्रमुख बनायचय की काय.ही माझ्या मनात शंका आहे. संजय राऊतना थांबवलं पाहिजे. पण त्यांना थांबवण्याची धमक उद्धव ठाकरेंमध्ये आहे का?” असा प्रश्न प्रसाद लाड यांनी विचारला.

उंगली कोणी केली?

सत्ताधारी या प्रकरणाचं राजकारण करतायत. आदित्य ठाकरेंचा संबंध नाही असं ठाकरे गट म्हणत आहे. त्यावर प्रसाद लाड म्हणाले की, “यात सत्ताधाऱ्यांचा प्रश्न येतोच कुठे? सन्मानीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, आमचे प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलय की हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. सीबीआयकडे हे प्रकरण आहे. सीबीआय सांगेल काय करायचं ते. सत्ताधाऱ्यांचं प्रश्न यात येत नाही. एकनाथ शिंदे म्हणाले मी या विषयात काही बोलणार नाही. त्यांच्या पक्षाचे नेते काही बोलत नाहीय. पण नितेश राणे, निलेश राणे बोलतयात पण माझा प्रश्न आहे, उंगली कोणी केली?”

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us