AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यात काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेता सोडणार पक्षाची साथ, भाजपमध्ये होणार पक्षप्रवेश

मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के सुरूच आहेत. आता पुन्हा एकदा भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

मोठी बातमी! राज्यात काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेता सोडणार पक्षाची साथ, भाजपमध्ये होणार पक्षप्रवेश
| Updated on: Sep 20, 2026 | 7:02 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के सुरूच आहेत. आता पुन्हा एकदा भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. हा काँग्रेस पक्षासाठी तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या तसेच चिखलीच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे शिलेदार असलेले माजी आमदार तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे हे भाजपच्या गळाला लागले असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

राहुल बोंद्रे यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.  काँग्रेस पक्षाने आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक संधी आणि पदे दिली, तसेच जिवाभावाची अनेक माणसं दिली, असे सांगत बोंद्रे यांनी काँग्रेससोबतच्या आपल्या प्रदीर्घ प्रवासाच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.  मुकुल वासनिक यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात करून दिली आणि अत्यंत प्रेम व मार्गदर्शन दिले, तर हर्षवर्धन सपकाळ यांनी भावाप्रमाणे प्रेम दिल्याचेही बोंद्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. मात्र आता राजकीय वळणावर आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राहुल बोंद्रे यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

सोबतच, काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांना आपण कधीही विसरणार नसल्याचेही त्यांनी भावनिकपणे म्हटले आहे. राहुल बोंद्रे यांच्या या भूमिकेमुळे चिखलीसह बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी महायुतीमधील घटक पक्षात प्रवेश केले आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. दरम्यान त्यानंतर आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी देखील यापूर्वी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल