उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचे ग्रहण, काय घडतंय?

भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र भाजपात बंडखोरीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुरीत शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीमुळे कदम कुटुंब नाराज आहे, तर पाथर्डीत मोनिका राजळे यांच्या उमेदवारीवरून अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांचा रोष आणि पक्षांतर्गत मतभेद यामुळे भाजपला निवडणुकीत आव्हान निर्माण झाले आहे. करमाळ्यात गणेश चिवटे यांनीही उमेदवारीसाठी फडणवीस यांची भेट घेतली आहे.

उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचे ग्रहण, काय घडतंय?
महाराष्ट्र भाजप
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 9:32 PM

भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रशेखर कदमांची नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असलेल्या माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. राहुरी विधानसभेसाठी सत्यजित कदम इच्छुक होते. पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांची नाराजी समोर आली आहे. सत्यजित कदम हे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. “कार्यकर्त्यांमुळे मी नेता झालो. त्यांना विचारूनच पुढचा निर्णय घेणार. दोन दिवसात निर्णय घेणार”, अशी भूमिका सत्यजित कदम यांनी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे पक्षाने सत्यजित कदम यांना तिकीट नाकारल्याने चंद्रशेखर कदम देखील नाराज आहेत. “मागील निवडणुकीत पक्षहितासाठी थांबलो. मात्र पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही. सत्यजित कदम आणि त्यांचे कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मी ठामपणे उभा राहणार”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर कदम यांनी दिली आहे.

शेवगाव पाथर्डीतही नाराजी नाट्य

शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मोनिका राजळे यांची उमेदवारी जाहीर करताच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. भाजपकडून मोनिका राजळे यांना उमेदवारी न देता भाजपचे ओबीसी जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांना द्यावी, अशी मागणी करत तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल केदार यांनी पक्षाकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोनिका राजळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत बंडाळीला सुरुवात झाली आहे. याआधी भाजप जिल्हा सरचिटणीस अरुण मुंडे आणि ओबीसी जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी उघडपणे राजळे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे पाथर्डी शेवगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये अंतर्गत कलह होण्याची शक्यता आहे.

करमाळ्याचे गणेश चिवटे यांनी घेतली फडणवीसांची भेट

सोलापुरातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे इच्छुक आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्ते आणि समर्थकांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे रावसाहेब दानवे यांची सुद्धा गणेश चिवटे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.