AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet Expansion 2024 : भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ

Cabinet Expansion 2024 : भरत गोगावले यांच्या ‘कोट’ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ

| Updated on: Dec 15, 2024 | 6:26 PM
Share

भरत गोगावले यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेण्याच्या संधी मिळेल या आशेने गेल्या सरकारमध्येच शपथविधी पूर्वी नवीन जॅकेट शिवले होते. मात्र त्याला मुहूर्त लागत नव्हता. मात्र आज अखेर भरत गोगावले यांनी ते नवं कोरं जॅकेट घालण्याची संधी मिळाली.

महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र प्रत्येक वेळी त्यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती. अशातच भरत गोगावले यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेण्याच्या संधी मिळेल या आशेने गेल्या सरकारमध्येच शपथविधी पूर्वी नवीन जॅकेट शिवले होते. मात्र त्याला मुहूर्त लागत नव्हता. मात्र आज अखेर भरत गोगावले यांनी ते नवं कोरं जॅकेट घालण्याची संधी मिळाली. अखेर यंदा फडणवीस सरकारमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची मंत्रि‍पदी वर्णी लागली आहे. भरत गोगावले यांनी देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळासाठी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून त्यांना शपथ देण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील भरत गोगावले यांचा सरपंच ते आमदार असा प्रवास राहिला आहे. भरत गोगावले यांनी महाड विधानसभा मतदारसंघातून 2009 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती आणि ते विजयी झालेत. 2009, 2014, 2019 आणि 2024 असे सलग चार वेळा त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्त्व केलं आणि आता त्यांची मंत्रि‍पदी वर्णी लागली आहे.

Published on: Dec 15, 2024 06:26 PM