AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतका वेळ फोनवर गप्पा? दिवस संपला, रात्र संपली, तरीही कॉल सुरूच, बडबडीचा विक्रम गिनीज बुकात

Longest Phone Call: रोजवर फोनवर एखादी व्यक्ती किती वेळ बोलत असेल? प्रेमी जोडपे असले तरी साधारणता दिवसरात्र तर बोलणार नाही, पण या दोघांनी फोनवर संभाषणाचे सर्व रेकॉर्ड तोडले आहे. तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या संभाषणाचा विक्रम नोंदवला गेला आहे.

इतका वेळ फोनवर गप्पा? दिवस संपला, रात्र संपली, तरीही कॉल सुरूच, बडबडीचा विक्रम गिनीज बुकात
Longest Phone Call
| Updated on: Mar 07, 2026 | 5:20 PM
Share

Guinness Book Records: रोज मोबाईलवर आपण कामानिमित्त अथवा कुणाची आठवण आली तर जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधतो. त्याच्याशी फोनवर काही वेळ संवाद साधतो. अनेक दिवसांनी कॉल केला असेल तर एक तास अथवा दोन तास बोलतो. पण एखादी व्यक्ती रात्रंदिवस फोनवर कुणाशी बोलत असेल तर, असा प्रकार क्विचतच घडतो. पण या दोघांनी फोनवर बोलण्याचा मोठा विक्रम घडवला आहे. या विक्रमाची नोंद द गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण नोंदवली गेली आहे.

आता स्मार्टफोनचा वापर केवळ कॉलिंग अथवा चॅटिंगपुरता मर्यादित नाही. आजकाल स्मार्टफोन नसेल तर अनेकांना करमत नाही. त्यांची ऊर्जाच कमी होते. आपण जेव्हा पण फोनवर बोलतो तेव्हा कॉलवर जास्तीत जास्त 20 मिनिटं, 30 मिनिटं वा 1 तास अथवा फार फार तर दोन तास बोलतो. फारच बडीबडी व्यक्ती असेल तर त्यात अजून अर्धा तासाची भर पडू शकते. पण एका फोन कॉलने जागतिक विक्रम केला आहे हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

46 तास 12 मिनिटे नॉनस्टॉप बडबड

तर जवळपास 16 वर्षांपूर्वी हा मोबाईलवर सर्वाधिक वेळ बोलण्याचा रेकॉर्ड करण्यात आला आहे. सर्वाधिक वेळ चाललेला हा कॉल आजही अबाधित आहे. वर्ष 2012 मध्ये हॉर्वर्ड विद्यापीठाचे Eric R. Brewster आणि Avery A. Leonard यांनी जवळपास 46 तास 12 मिनिटं 52 सेकंद आणि 228 मायनर सेकंद पर्यंत एकमेकांशी विविध विषयावर गप्पा हाणल्या म्हणजे चर्चा केली. या संपूर्ण प्रदीर्घ चर्चेत या दोघांना 10 सेंकदापेक्षा अधिक शांत न राहण्याची ताकीद होती. म्हणजे त्यांना दहा सेंकदापर्यंत न बोलण्याची मुभा होती. तर एक तासानंतर या दोघांना पाच मिनिटांचा ब्रेक देण्यात आला होता. कारण इतका वेळ बोलण्यासाठी त्यांना हा ब्रेक देणे आवश्यक होते. तर त्यापूर्वी Sunil Prabhakar यांनी 2009 मध्ये 51 तास गप्पा मारल्या होत्या. पण त्यांनी विविध व्यक्तींशी ही चर्चा केली होती. एकाशी बोलणं संपल्यावर ते दुसऱ्या व्यक्तीशी फोनवर बोलत होते.

Follow Us
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.