AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचे धक्कातंत्र, 26 वर्षे पक्षासाठी झटणाऱ्या नेत्याला साईडलाईन केलं? ठाकरे गटाचा खळबळजनक आरोप

भाजपच्या नवीन प्रदेश कार्यकारिणीत केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करत त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावर उपाध्ये यांनी दिलेली 'पोस्टकार्ड'ची उपमा आणि सुषमा अंधारे यांनी केलेली सडकून टीका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

भाजपचे धक्कातंत्र, 26 वर्षे पक्षासाठी झटणाऱ्या नेत्याला साईडलाईन केलं? ठाकरे गटाचा खळबळजनक आरोप
Keshav Upadhye
| Updated on: Feb 24, 2026 | 1:35 PM
Share

महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या निवडणुकांची रणधुमाळी शांत झाल्यानंतर आता भाजपने हळूहळू नवनवीन बदल करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने नुकतंच संघटनात्मक फेरबदलांचा मोठा निर्णय घेतला आहे. या फेरबदलात काही जुन्या नेत्यांना नवीन जबाबदारी दिली आहे. तर काहींना या यादीतून डच्चू देण्यात आला आहे. भाजपचे आक्रमक आणि संयमी चेहरा असलेल्या केशव उपाध्ये हे गेल्या ८ वर्षांपासून मुख्य प्रवक्ते म्हणून भाजपची बाजू मांडताना दिसत होते. मात्र नव्या कार्यकारिणीत नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर केशव उपाध्ये यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. या निवडीनंतर केशव उपाध्ये यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

केशव उपाध्ये यांनी गेल्या ८ वर्षांपासून भाजपचे मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळली. टीव्हीवरील डिबेट असो वा सोशल मीडियावरील विरोधकांचे हल्ले, उपाध्ये यांनी नेहमीच पक्षाची बाजू आकडेवारीसह ठामपणे मांडली. आता त्यांच्या जागी नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्ये यांना संघटनेत बढती देऊन उपाध्यक्ष करण्यात आले आहे. यानंतर केशव उपाध्ये यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेल्या एका उदाहरणाचा दाखला देत प्रतिक्रिया दिली आहे.

केशव उपाध्ये यांचे ट्वीट

चंद्रकांत दादा पाटील हे अध्यक्ष असताना त्यांनी एक उदाहरणं दिलेलं आठवत. संघ परिवारात कार्यकर्ता हा पोस्टकार्ड प्रमाणे असतो. जो पत्ता त्यावर टाकाल त्या पत्त्यावर ते पोस्टकार्ड जातं. २६ वर्षे पक्षाचं काम करीत आहे. जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि गेले ८ वर्ष भाजपाचा मुख्य प्रवक्ता म्हणून काम करत होतो. आता पक्षाने मला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. मी नेतृत्वाचा आभारी आहे, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत पक्षाचे आभार मानले.

keshav upadhye (

keshav upadhye

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

तर दुसरीकडे भाजपच्या या नवीन यादीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनीही ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे.

भाजपच्या नवीन कार्यकारिणीची यादी आज बघितली… उपाध्ये यांना हळूहळू सतरंजीच्या कोपऱ्यावर आणून हाकलण्याची तयारी सुरू झाली आहे हे बघून खंत वाटली… भाजपच्या संघर्षाच्या काळात भाजपाला सत्ता स्थानी पोहोचवण्यासाठी ज्या लोकांनी खस्ता खाल्ल्या त्यांना नव्या लोकांच्यासाठी सतरंज्या टाकण्याचे काम भाजपाने दिले आहे… ही फडणवीसांची भाजपा आहे.. !, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

sushma andhare

sushma andhare

अनेक जुन्या आणि विश्वासू चेहऱ्यांना स्थान

दरम्यान भाजपने नव्या कार्यकारिणीत अनेक जुन्या आणि विश्वासू चेहऱ्यांना प्रदेश स्तरावर उपाध्यक्ष आणि सरचिटणीस पदांची जबाबदारी दिली आहे. तसेच सोशल मीडिया आणि संवाद विभागासाठी तरुण फळीला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच प्रादेशिक समतोल राखण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना विशेष स्थान देण्यात आले आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या