भाजप खासदाराचं सूचक विधान, निवडून येणारा अपक्ष उमेदवार कोण? खासदारांचं सूचक विधान काय?

| Updated on: Jan 30, 2023 | 11:59 AM

बरेचसे उमेदवार हे अपक्ष उभे आहेत, जो उमेदवार निवडून येईल तो भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने निवडून येईल. पार्टीच्या ज्या सूचना आहेत त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह मतदान केले आहे.

भाजप खासदाराचं सूचक विधान, निवडून येणारा अपक्ष उमेदवार कोण? खासदारांचं सूचक विधान काय?
Image Credit source: Google
Follow us on

रवी गोरे, टीव्ही 9 मराठी, मुक्ताईनगर : राज्यातील पाच विभागात विधानपरिषदेच्या निवडुकीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये उमेदवारांपासून राजकीय नेत्यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. नाशिकची निवडणूक यामध्ये लक्षवेधी ठरत आहे. कारण नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपने उमेदवार दिला नसून कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार असतांनाही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर यामध्ये सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवून निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे. यामध्ये सत्यजित तांबे यांना अहमदनगरमधून भाजपच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी कुठे छुपा तर कुठे उघड पाठिंबा भाजपकडून दिला जात आहे. यामध्ये भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी सूचक विधान केले आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या रक्षा खडसे यांनी निवडून येणाऱ्या अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा असेल असं म्हणून गुगली टाकली आहे.

खरंतर रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहे. तर त्यांच्या नणंद असलेल्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आहे. त्यामुळे त्यांच्या एकत्रित येण्याच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया देतांना सूचक विधान करून भाजपाचा पाठिंबा कुणाला आहे हे सांगून टाकलं आहे. निवडून येणाऱ्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा असल्याचे म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

जो आदेश आमच्या पक्षाच्या नेत्यानी ज्या उमेदवारासाठी दिला आहे तो उमेदवार निश्चितच विजय होईल असं खासदार रक्षा खडसे यांनी म्हंटलं आहे.

बरेचसे उमेदवार हे अपक्ष उभे आहेत, जो उमेदवार निवडून येईल तो भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने निवडून येईल. पार्टीच्या ज्या सूचना आहेत त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह मतदान केले आहे.

मुक्ताईनगर मध्ये सकाळपासून पदवीधर उत्साहाने मतदान करत आहे, मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी मतदानाच्या दरम्यान दिली आहे.