BMC : सायबर साक्षरता, पोक्सो जनजागृती ते जादूई पिटारा… मुंबई महापालिकेच्या एज्युकेशन बजेटमध्ये काय काय?

मुंबई महानगरपालिकेने 2026-27 साठी 4248.08 कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सायबर साक्षरता, POCSO कायद्याविषयी जनजागृती आणि 'जादुई पिटारा' वाटप यावर भर दिला आहे. डिजिटल वर्गखोल्या, विज्ञान पार्क, आणि मोफत शैक्षणिक साहित्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे मुंबईतील शिक्षण गुणवत्ता वाढेल.

BMC : सायबर साक्षरता, पोक्सो जनजागृती ते जादूई पिटारा... मुंबई महापालिकेच्या एज्युकेशन बजेटमध्ये काय काय?
मुंबई महापालिकेचं एज्युकेशन बजेट
| Updated on: Feb 25, 2026 | 12:30 PM

मुंबई महापालिकेचा (BMC) आर्थिक वर्ष 2026-27साठीचा शिक्षण विभागाचा 4248.08 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षणावर भरीव तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सायबर साक्षरतेचे ज्ञान देण्यापासून ते जादूई पिटाऱ्याचं वाटप करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. तब्बल पाच वर्षानंतर नवनिर्वाचित प्रतिनिधींनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे.

बजेटमधील तरतूदी काय ?

शिक्षण खात्याचा 4248.08 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

शालेय शैक्षणिक मोफत साहित्यासाठी 187.57कोटी रुपयांची तरतूद

इंग्रजी भाषा प्रयोग शाळा – मुंबई महानगर पालिका शाळेतील इयत्ता 8 ते 10च्या विध्यार्थ्यांना 278 इंग्रजी भाषा प्रयोग शाळा सुरु करणार एकूण तरतूद – 3.87 कोटी

महानगर पालिका 2 शाळेत विज्ञान पार्क उभारण्यात येणार – 5 कोटी रुपये तरतूद

सायबर साक्षरता – मुंबई महानगर पालिकेच्या 8 वी ते 9 वीच्या 20 हजार विद्यार्थ्यांना सायबर साक्षरता व्हावी यासाठी सायबर प्रशिक्षण दिले जाणार यासाठी प्राथमिक शाळांना 11.80 कोटीची तरतूद तर माध्यमिक शाळांना 11.80 टक्के तरतूद

विज्ञान प्रयोगशाळा अद्यावत – 10 लाखाची तरतूद

महानगर पालिकेच्या शाळातील विध्यार्थ्यांना सुरक्षा कायद्याचे शिक्षण दिले जाणार

POCSO कायद्याचे विध्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाणार

शैक्षणिक वर्षात ड्रग्ज व्यसनाधिता याचे दुष्परिणामाविषयी जनजागृती केली जाणार

खान अकॅडमीच्या माध्यमातून गणित आजी विज्ञाणाचा सराव केला जाणार गणित गुरवार उपक्रमाची सुरवात यासाठी 1.20 लाखाची तरतूद

2026 च्या वर्षात मुंबई महानगर पालिका शाळेच्या इमारती बांधल्या जाणार असून काही इमारतीची दुरुस्ती केली जाणार

नवीन बांधकामाची एकूण 57 कामे पूर्ण करण्यात येणार असून उर्वरित 15 कामे यावर्षात पूर्ण करण्यात येणार यासाठी 340 कोटीची तरतूद

मुंबई महानगर पालिकेच्या एकूण 569 शालेय इमारतीची देखभाल करण्यासाठी 180.27 कोटी रुपये तरतूद

मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमध्ये CCTV बसवण्यासाठी 42 कोटी रुपयांची तरतूद

मुंबई महानगर पालिकेच्या शाळेत डिजिटल क्लासरूम – प्राथमिक शाळेसाठी 23.38 कोटीची तरतूद तर माध्यमिक शाळांसाठी 1.08 कोटीची तरतूद

शालेय वस्तूचा मोफत पुरवठा करण्यासाठी निविदा प्राथमिक शाळासाठी 150.57 कोटीची तरतूद, माध्यमिक शाळांसाठी 37 कोटीची तरतूद

विध्यार्थ्यांना अत्याधुनिक बैठक व्यवस्था – 2026 -27 मध्ये नर्सरी ते 10वीच्या विदयार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी 34 कोटी 28 लाखांची तरतूद

शालेय विद्यार्थ्यांसाठी बेस्ट बस अंतर्गत मोफत प्रवास यासाठी 8.70 कोटींची तरतूद

खाजगी प्राथमिक शाळांना 690 कोटी रुपये अनुदानाची तरतूद

>> शालेय शिक्षण विभागात नवीन काय

इयत्ता 10 वीच्या परिक्षेत 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणा-या मुंबईतील पहिल्या 25 विद्यार्थांना पदवीपर्यंतची पदवीपर्यंतचा शैक्षणिक खर्च महापालिका उचलणार, ट्युशन फी पालिका देणार

ड्रग्स, व्यसनाधिनता यांच्या दुष्परिणांमांबाबत जनजागृती करण्याकरता विशेष सत्र , शिबीरं घेणार

गणित विषयाची भीती कमी करण्याकरता गणित गुरुवार उपक्रमाची सुरुवात

ग्रंथालय अद्ययावतीकरण- 5 कोटी तरतुद

संगीत साहित्य खरेदी- 36 कोटी

इयत्ता 3 री ते 8 वीच्या विद्यार्थयांकरता वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

इको वॉरियर्स हा पर्यावरण संवर्धन उपक्रम- 2. 40 कोटी

दिव्यांग थेरपी साहित्य- 10 लाख

सांघिक खेळांसाठी सुविधा देणार

कलेचे प्रशिक्षण देण्याकरता 3 आर्ट एक्सलेंस सेंटर तयार करणार

अंधेरी पूर्व मध्ये नवीन सिबीएसई शाळा सुरु करणार