Maharashtra Election News LIVE : गावकी पुढे भावकी चालत नाही-नवनाथ बन

BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार असून दुपारी नाशिकमध्ये पहिला कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. ताज्या घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

Maharashtra Election News LIVE : गावकी पुढे भावकी चालत नाही-नवनाथ बन
| Edited By: | Updated on: Dec 27, 2025 | 1:16 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 27 Dec 2025 01:30 PM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस

    मोहिते पाटील यांचे निकटवर्तीय बाबाराजे देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. बाबाराजे देशमुख हे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत देशमुख यांचा भाजप प्रवेश झाला.माळशिरस तालुक्यात आगामी झेडपी निवडणुकीसाठी भाजपची ताकद वाढली.तर मोहिते पाटील यांची नातेपुते येथील ताकद कमी करण्यात माजी आमदार राम सातपुते यांचा प्रयत्न यशस्वी झाला.

  • 27 Dec 2025 01:20 PM (IST)

    महेंद्र थोरवे मंगेश काळोखे यांच्या घरी

    मंगेश काळोखे यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे जे आहे ते त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत. सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे. नातेवाईक ग्रामस्थ आणि त्यांच्या समर्थकांकडून ही मागणी करण्यात येत आहे. खोपोली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात येत आहे.

  • 27 Dec 2025 01:10 PM (IST)

    अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस

    छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक अर्ज भरण्यासाठी आजच्या सह केवळ चार दिवस शिल्लक आहेत. उद्या रविवार असल्याने सुट्टीमुळे उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांना फक्त 29 आणि 30 हे दोनच दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिळणार आहे.त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटची 30 तारीख असल्याने, अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे

  • 27 Dec 2025 01:00 PM (IST)

    शक्य तिथे आघाडीचा आदेश

    मुंबई काँग्रेस वंचित आघाडीबाबत विजय वडेट्टीवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जिथे शक्य तिथे आघाडी करा असा आदेश आहे. भाजपला आघाडी केलेले पक्ष सोडून आम्हाला समविचारी पक्षाशी आघाडी करण्याच्या सूचना आम्ही दिलेत. मुंबई येथे देखील स्थानिक नेत्यांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आज किंवा उद्या मध्ये अंतिम निर्णय होईल. जागा वाटपात आकडेवारी इकडे तिकडे होऊ शकेल. प्रत्येकानी दोन पाऊले मागे घेऊन कार्यकर्त्याच्या भावनांचा आदर केला पाहिजे. मी त्या प्रक्रियेत नाही. त्यामुळे मुंबईच्या नेत्यांशी चर्चा केल्यावर सांगू शकेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

  • 27 Dec 2025 12:58 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू

    मनोज जरांगे पाटील यांचे ब्लड सॅम्पल घेतल आहे, बाकीचे ट्रीटमेंट सुरू आहे रेगुलर जसं व्हायरल आहे तसच त्यांना पण आहे. दोन वर्षापासून सुरू असलेल्या उपोषणामुळे परिणाम होत आहे. उपोषणाच्या परिणामामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे. जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर विनोद चवरे यांनी  माहिती दिली आहे.

  • 27 Dec 2025 12:46 PM (IST)

    काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

    सोलापूर महानगर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. समाजवादी पार्टीने मुंबईसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

  • 27 Dec 2025 12:25 PM (IST)

    महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत हिंदुत्ववादी नेत्यांची जोरदार मागणी

    उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवनकल्याण तर राज्यातले हिंदुत्ववादी नेते आणि मंत्री नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्या सभांची जोरदार मागणी.हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभा मिळवण्यासाठी वरील नेत्यांकडे कार्यकर्त्यांची फिल्डिंग. ठाकरे बंधूंच्या मराठी विरूद्ध अमराठी नरेटीव्हला छेद देण्यासाठी हिंदुत्ववादी नरेटीव्हचा महायुतीकडून उतारा. मुंबईसह वसई विरार, मिरा भाईंदर, भिवंडी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक पुणे, पिंपरी-चिंचवड, आहिल्यानगर, सोलापुर ह्या सर्वच महानगरपालिकेतील उमेदवारांना हव्यात मंत्री नितेश राणे यांच्या प्रचारसभा.

  • 27 Dec 2025 12:12 PM (IST)

    नांदेडमध्ये दिवसाढवळ्या तरुणांची भर रस्त्यावर गुंडागर्दी

    नांदेडमध्ये दिवसाढवळ्या तरुणांची भर रस्त्यावर गुंडागर्दी. रस्त्यावर दगडफेक करत काठ्याने एकमेकांना जोरदार हाणामारी. नांदेड शहरातील गजबजलेल्या आणि खाजगी शिकवणी वर्ग असलेल्या भाग्यनगर परिसरातील घटना.फ्रीस्टाइल गुंडागर्दी करतानाचा टोळक्याचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल.

  • 27 Dec 2025 11:58 AM (IST)

    मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पाच आरोपी अटकेत – खोपोली पोलीस ठाण्याबाहेर कडेकोट बंदोबस्त

    मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. यामध्ये रवींद्र परशुराम देवकर, त्यांचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर यांच्यासह आणखी तीन आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या पार्श्वभूमीवर खोपोली पोलीस स्थानकाच्या बाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 27 Dec 2025 11:50 AM (IST)

    – मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली

    मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर येत आहे.  थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात होणार दाखल आहेत..

  • 27 Dec 2025 11:45 AM (IST)

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 9 जानेवारी पासून बंद राहणार

    भिमाशंकर मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे नव्याने काम होणार असल्याने दुर्घटना घडु नये यासाठी मुख्य मंदिर दर्शानासाठी तीन महिने बंद रहाणार आहे. श्री.भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत सविस्तर चर्चा करून सर्वाच्या सहमतीने मंदीर तीन महिन्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  महाशिवरात्रीचा दि. 12.02.2026 ते दि18.02.2026 हा सात दिवसाच्या कालावधी वगळण्यात आलेला असून या कालावधीत मंदीर भाविकांकरिता दर्शनाकरिता खुले राहणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर मंदिर तीन महिने बंद राहणार…

  • 27 Dec 2025 11:30 AM (IST)

    मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या समन्वय समिती आज पुन्हा बैठक

    मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या समन्वय समिती आज पुन्हा बैठक झाली.  सकाळी ११ वाजता भाजप – सेना नेत्यांची रंगशारदा येथे संयुक्त बैठक घेण्यात आली. जागांची अदलाबदल, उमेदवारांची देवाणघेवाण आणि प्रचाराच्या स्ट्रॅटर्जीवर चर्चा पार पडणार आहे.  जवळपास १०-१५ जागांवर उमेदवार अदलाबदल आणि देवाणघेवाण केला जाणार.

  • 27 Dec 2025 11:19 AM (IST)

    मालेगाव पुणे महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला

    इंदोर मनमाड रेल्वे मार्गाच्या जमीन अधिग्रहण दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला.  मालेगाव तालुक्यातील चोंडी गावाजवळ महामार्ग रोखला.  मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या जमीन अधिग्रहण मध्ये शेतकऱ्याच्या जमिनींना कवडीमोल भाव आकारल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शासनाने मागण्या मान्य करण्यासाठी शेतकऱ्यांचा महिनाभरातील तिसरा रस्ता रोको केला. जमीन अधिग्रहण झालेल्या एका शेतकऱ्यानी आत्मदहनसाठी आणलेलं पेट्रोल, माचिस घेतली पोलिसांनी ताब्यात घेतली.

  • 27 Dec 2025 10:55 AM (IST)

    मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या समन्वय समिती आज पुन्हा बैठक

    सकाळी 11 वाजता भाजप – सेना नेत्यांची रंगशारदा येथे संयुक्त बैठक. जागांची अदलाबदल, उमेदवारांची देवाणघेवाण आणि प्रचाराच्या स्ट्रॅटर्जीवर चर्चा पार पडणार. जवळपास 10-15 जागांवर उमेदवार अदलाबदल आणि देवाणघेवाण केला जाणार

  • 27 Dec 2025 10:50 AM (IST)

    मनसेच्या नेत्यांची आज 11 वाजता शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांनी बोलवली बैठक

    बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या सोबत निवडणुकीत अडलेल्या चार जागांवर चर्चा होणार. निवडणूक campaign आणि सभा रॅली बाबत देखील या बैठकीत आढावा घेतला जाणार. लढवल्या जाणाऱ्या जागांचा विषय आज पूर्णपणे संपवला जाणार

  • 27 Dec 2025 10:40 AM (IST)

    सटाणा शहरात भीषण अपघाताची घटना

    खडीने भरलेला भरधाव ट्रक थेट दुकानात घुसला. साक्री–शिर्डी महामार्गावरील परिसरात अपघात. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्घटना. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. दुकानाचे मोठे नुकसान; परिसरात खळबळसुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

  • 27 Dec 2025 10:32 AM (IST)

    संजय राऊतांचा अत्यंत मोठा दावा

    आमचे नुकसान होत असतानाही आम्ही शरद पवारांना जागा देत होतो, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.

  • 27 Dec 2025 10:30 AM (IST)

    आम्ही आमच्या सीटिंग जागा दिल्या- संजय राऊत

    शरद पवार आमच्यासोबत असावेत, ही आमची सर्वांची भावना असल्याचे नुकताच संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही आमच्या सीटिंग जागा दिल्याचेही त्यांनी म्हटले.

  • 27 Dec 2025 09:52 AM (IST)

    कल्याण–डोंबिवलीत ठाकरे आणि मनसे युतीचा फॉर्म्युला ठरला

    कल्याण–डोंबिवलीत ठाकरे आणि मनसे युतीचा फॉर्म्युला ठरला.  महानगरपालिकेसाठी 122 पैकी 54 जागांवर मनसे, तर ठाकरे गट 68 जागांवर लढणार आहे.  शंभर टक्के जागावाटप पूर्ण झालं आहे.

    भाजप–शिवसेना महायुती ही स्वतःच्या ओझ्याने पडणार, युतीत प्रवेश केलेल्या लोकांना कसा न्याय देणार? जागावाटपानंतर ठाकरे गटाने महायुतीवर टीका केली आहे.

  • 27 Dec 2025 09:33 AM (IST)

    मालेगाव महापालिका निवडणूक मनसे, शिवसेना (UBT) एकत्र लढवणार

    मालेगाव महापालिका निवडणूकत मनसे, शिवसेना (UBT) एकत्रित लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस, मनसे, शिवसेना (UBT), माकप (CPM) यांची संयुक्त बैठक झाली.  आघाडी करून निवडणूक लढण्याचा निर्णय, आघाडीतून लढणाऱ्या 25 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आज जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

     

  • 27 Dec 2025 09:15 AM (IST)

    अमोल कोल्हे यांनी घेतली अजित पवारांची भेट

    काल युतीची चर्चा फिस्कटली, आज अमोल कोल्हे यांनी घेतली अजित पवार यांची भेट. जिजाई बंगल्यावर दोघांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 27 Dec 2025 09:07 AM (IST)

    मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नागपूर महापालिकेकडून मतदार जागृती

    मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नागपूर महापालिकेकडून मतदार जागृती करण्यात येत आहे. शहरातील 335 ठिकाणी जागरूकता फलक लावले जाणार असून त्यासाठी स्थळ निश्चिती करण्यात आली आहे.

    “भाऊ असेल तू खरा नागपुरी तर वोट करना बहुत जरुरी”, “थांबणार नाही मतदान करणारच”, असे वेगवेगळे आशय घेऊन अगदी नागपुरी शैलीत हे हे होर्डिंग बनवण्यात आले आहेत.  होर्डिंग बॅनर, स्टिकर, बॅचेस, जिंगल, बस स्टिकर्स, सेल्फी पॉईंट स्क्रीन द्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन केले जात आहे.

  • 27 Dec 2025 09:04 AM (IST)

    उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे के वरना बाटोगे तो पिटोगे, वादग्रस्त बॅनरने खळबळ

    उत्तर भारतीय सेनेने सेना भवनासमोर पुन्हा एकदा वादग्रस्त बॅनर लावला आहे.  उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे के वरना बाटोगे तो पिटोगे #बीएमसी, असे या बॅनरवर लिहीण्यात आलं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, या बॅनरद्वारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना उत्तर देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

वसई विरार महापालिका निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक भाजपा नेतृत्वाने वारंवार बैठका घेऊन, युतीच्या जागावाटपाची घोषणा करताना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मालेगावात काँग्रेस व एमआयएमची पहिली यादी जाहीर झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाने एमआयएमची आघाडी रद्द झाली असून काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते , आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून ते तपोवन परिसरात झाडांची पाहणी करणार आहेत. तर दुपारी नाशिकमध्ये पहिला कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. यासह देश विदेश, महाराष्ट्र, मनोरंजनव, क्रीडा, राजकारण या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.