VIDEO : ब्रह्मनाळ बोट बुडाली ते ठिकाण आज पाहा, विश्वास बसणारच नाही!

ब्रह्मनाळ गावात जी बोट बुडाली ते ठिकाणी आज जर पाहिलं तर कुणालाही विश्वास बसणार नाही की इथेच बोट बुडाली. कारण बोट बुडाली ते ठिकाण म्हणजे नदीचं पात्र किंवा खोलगट भाग नव्हता, तर नेहमीचा वर्दळीचा डांबरी रस्ता आहे.

VIDEO :  ब्रह्मनाळ बोट बुडाली ते ठिकाण आज पाहा, विश्वास बसणारच नाही!


ब्रह्मनाळ (सांगली) : पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ (Brahmanal Boat Overturn) या पुराने वेढलेल्या गावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेला आता 12 दिवस झाले आहेत. या दुर्घटनेत चार महिन्यांच्या बाळासह तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला. 8 ऑगस्टला ही दुर्घटना झाली.  पुरामुळे ब्रह्मनाळचं मोठं नुकसान झालं आहे.

पुरानंतरचं ब्रह्मनाळ कसं आहे याचा आढावा टीव्ही 9 मराठीने घेतला. आजच्या घडीला महापूर ओसरला आहे. पात्र सोडलेली नदी पुन्हा पूर्वस्थितीत आली आहे.  गावात लखलखीत उन पडलं आहे. रस्त्यावर गाड्या धावत आहेत. गावगाडा रोजच्या कामात व्यस्त आहे, आता दैनंदिन व्यवहार सुरु झाले आहेत.

ब्रह्मनाळ गावात जी बोट बुडाली ते ठिकाणी आज जर पाहिलं तर कुणालाही विश्वास बसणार नाही की इथेच बोट बुडाली. कारण बोट बुडाली ते ठिकाण म्हणजे नदीचं पात्र किंवा खोलगट भाग नव्हता, तर नेहमीचा वर्दळीचा डांबरी रस्ता आहे. हा रस्ता गावात प्रवेश करणारा प्रमुख आणि पक्का रस्ता आहे. त्यामुळे ज्या रस्त्याने नेहमीची ये-जा होते, त्या रस्त्यावरच बोट बुडून घात झाल्याचं दिसून येतं.

बुडालेली बोट आजही त्याच दुर्घटनास्थळी आहे. त्या ठिकाणावरुन बोट हलवलेली नाही. बोटीच्या बाजूला बुडालेल्यांचे कपड्याचे तुकडे, साहित्य पडलेलं आहे. नेहमी पाण्यात असलेली बोट आज कोरडीठाक आहे. रस्ताही उन्हाने तापत आहे. रस्त्याच्या बाजूची शेती ओलसर आहे. पण याच रस्त्यावर बोट बुडाली हे इथल्या लोकांना आजही पटत नाहीत.

त्या दिवशी काय झालं होतं?

सांगलीतील 4 तालुक्यांना पुराचा वेढा होता. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ (Brahmanal Boat Overturn) गावात पाणी शिरलं होतं. त्यामुळे या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. गावातील ग्राम पंचायतीच्या बोटीतून गावकरी सुरक्षितस्थळी जात होते. बोटीची क्षमता 17 जणांची असताना या बोटीत 30 जण बसले होते. त्यामुळे बोटीला दुर्घटना झाली आणि ती बुडाली.

नदीपात्रापासून दीड किलोमीटरपर्यंत बाहेर 15 फुटांपेक्षा वर पाणी होतं. आजूबाजूचा ऊस, झाडं बुडाली होती. त्या परिस्थितीत ही बोट निघाली होती. त्यावेळी बोटीच्या पंख्यात झाडाची फांदी अडकल्याने बोट दुर्घटनाग्रस्त झाल्याचं सांगण्यात आलं होतं.

VIDEO :

संबंधित बातम्या 

सांगली ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेतील आणखी 5 मृतदेह हाती, मृतांचा आकडा 17 वर    

PHOTO : बुडालेल्या बोटीचे फोटो, चिखलाने भरलेलं गाव, कसं आहे ब्रह्मनाळ?   

सांगलीतील बोट दुर्घटनाग्रस्त ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकरांकडून दत्तक