बुलडाण्यात नाना पटोलेंच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध, डॉ. राजेंद्र शिंगणेंवर केली होती अप्रत्यक्ष टीका

| Updated on: Nov 14, 2021 | 2:55 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुलडाण्याच्या पालकमंत्र्यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली होती. दुकान बंद करायला किती वेळ लागेल, असे वक्तव्य शेगावातील एका कार्यक्रमात नाना पटोले यांनी केले होते. या त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.

बुलडाण्यात नाना पटोलेंच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध, डॉ. राजेंद्र शिंगणेंवर केली होती अप्रत्यक्ष टीका
निषेध व्यक्त करताना जळगाव-जामोदचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते.
Follow us on

बुलडाणा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुलडाण्याच्या पालकमंत्र्यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली होती. दुकान बंद करायला किती वेळ लागेल, असे वक्तव्य शेगावातील एका कार्यक्रमात नाना पटोले यांनी केले होते. या त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. काल जळगाव-जामोद येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये पटोलेंच्या वक्तव्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

पटोलेंनी दिला होता स्वबळाचा नारा

येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेस कोणासोबतही युती करणार नाही. सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत नाना पटोले यांनी दिले होते. यानंतर मागील आठवड्यात शेगावात आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांवर वेगळ्या शब्दात टीका केली. बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार तथा पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करीत त्यांचे दुकान बंद करण्याची टिपण्णी नाना पटोले यांनी केली होती.

एकमेव दुकान बंद करायची

नाना पटोले म्हणाले होते, पश्चिम महाराष्ट्रातील दुकाने बंद केलीत. आता बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव दुकान बंद करायची आहे. अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे नाव न घेता केली होती. या वक्तव्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पटोले यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले ?

नाना पटोले म्हणाले होते की , पंढरपुरात अजित पवार बसले. जयंत पाटील सह राष्ट्रवादीचे सर्व महान नेते बसले. मात्र तिथे ते हरले आणि त्यांची दुकान बंद झालीय. विदर्भातील एकच असून ती सुद्धा बंद करायला किती वेळ लागेल ? असे म्हणत स्वबळाचा नारा दिला होता.

इतर बातम्या :

…’ती’ तर भाजपाची जुनी सवय; अमरावती हिंसाचारावरून पटोलेंचा टोला

अमरावतीपाठोपाठ अकोल्यातील अकोटमध्येही संचारबंदी, दगडफेकीच्या घटनेनंतर तात्काळ निर्णय